माढ्यासाठी धैर्यशील मोहितेंची भाजपला सोडचिठ्ठी; राजीनामा बावनकुळेंनी केला कन्फर्म!
Chandrashekhar Bawankule on Madha Lok Sabha : महाविकास आघाडीने जागावाटप करत अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले. परंतु, माढा मतदारसंघात अजून (Madha Lok Sabha) उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात शरद पवार कुणाला तिकीट देणार याची चर्चा सुरू असतानाच भाजपला धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. माढ्यात धैर्यशील मोहिते पाटीलच उमेदवार असतील असं निश्चित आहे. आता फक्त त्यांची उमेदवारी घोषित होण्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान, मोहिते पाटील यांचा राजीनामा मिळाला असून तो आम्ही स्वीकारला आहे, अशी माहिती आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Madha Lok Sabha : राष्ट्रवादीची धाकधुक वाढली; आमदार शिंदे बंधुंची महत्त्वाच्या बैठकीला दांडी
बावनकुळे म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील यांचा राजीनामा मिळालेला असून त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला आहे. मोहिते पाटलांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही कुठेही कमी पडलो नाही. त्यांचा मान, प्रतिष्ठा ठेवण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला. ऐन निवडणुकीमध्ये त्यांनी असा राजीनामा देणं योग्य नव्हतं. मात्र त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे.
विधानपरिषदेच्या राजीनाम्याबाबत रणजितसिंह मोहिते पाटील मला काही बोलले नाहीत. रणजीत सिंह यांची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे. ते आमच्या सोबत राहतील. शरद पवारांनी टाकलेला हा डाव वगैरे आम्ही म्हणत नाही. आमच्याकडे दररोज हजारोंनी पक्षप्रवेश होत आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या जागावाटपाबाबत बावनकुळे म्हणाले, त्याची काहीही काळजी करू नका अर्धा तासाची बैठक होईल आणि तिढा सुटेल.
जानकारांना सोबत घेणार, माढा सोडणार.. पवार-ठाकरे साधणार पाच समीकरणे
ईडीच्या कारवाया भाजपपेक्षा काँग्रेस सरकारच्या काळात जास्त झाल्या आहेत. या कारवाया भाजप करत नाही. ज्या सर्च रिपोर्ट मध्ये येतात. त्यात कमी जास्त पणा आढळला तर चौकशी करतात. महाविकास आघाडीने आमच्या 50, 100 लोकांच्या चौकशा केल्या होत्या. त्यामुळे या कारवयांमध्ये प्रधानमंत्री किंवा प्रत्यक्ष सहभागी नसतो अशा शब्दांत बावनकुळे यांनी शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांना प्रत्युत्तर दिले.