अहिल्यानगरच्या जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडू वरिष्ठ महिला महाराष्ट्र फुटबॉल संघात ; अध्यक्ष फिरोदियांनी दिल्या शुभेच्छा!

Ahilyanagar District Football Association Players

Ahilyanagar District Football Association Players in senior women’s Maharashtra football team; President Firodia congratulates them : अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनसाठी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. कारण जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडू राणी कदम व सुमैया शेख यांची निवड वरिष्ठ महिला महाराष्ट्र फुटबॉल संघात झाली आहे. हा संघ वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा – राजमाता जिजाबाई ट्रॉफी साठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

बांधवानो तयारीला लागा; नारायण गडावरून मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

महाराष्ट्र संघासाठी आयोजित निवड शिबिरात अहमदनगर जिल्ह्यातून राणी कदम, सुमैया शेख व तनिषा शिरसूल या खेळाडूंना संधी मिळाली होती. त्यापैकी राणी कदम व सुमैया शेख अंतिम संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या असून, विशेष अभिमानाची बाब म्हणजे राणी कदम हिला महाराष्ट्र संघाचे नेतृत्व (कर्णधारपद) सोपविण्यात आले आहे.

सणासुदीच्या काळात हृदयाकडे दुर्लक्ष नकाे! हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी काय कराल, डॉक्टर सांगतात…

हा ऐतिहासिक क्षण केवळ वैयक्तिक कामगिरी नाही, तर अहिल्यानगरच्या क्रीडाक्षेत्रासाठी नवे दालन उघडणारा आहे. या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर , उपाध्यक्ष खालिद सय्यद, अमरजीतसिंग शाही, जोगासिंग मिन्हास, सचिव रोनप फर्नांडिस, सह सचिव व्हिक्टर जोसेफ, प्रदीप जाधव, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहखजिनदार रणबीरसिंग परमार, सदस्य राजू पाटोळे, जोयब खान , महिला संघाचे प्रशिक्षक शशांक वाल्मिकी, व्यवस्थापक काजल वाल्मिकी, तसेच सर्व पदाधिकारी, सदस्यांनी, पालक , शाळा आणि क्रीडा संस्थां अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube