Petrol price cut:मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल व डिझेल झाले स्वस्त !

  • Written By: Published:
Petrol price cut:मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल व डिझेल झाले स्वस्त !

loksabha-election-central goverment- petrol and diesel rate cut नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सत्ताधारी भाजप पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. त्यात आता सरकारकडून पेट्रोल व डिझेलच्या (petrol and disel) किंमतीत कपात करण्यात आली आहे. लिटरमागे दोन रुपये किंमत कमी करण्यात आली आहे. ही कपात उद्यापासून लागू (15 मार्च) होणार आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. याचबरोबर एलपीजी आणि सीएनजीच्या किंमतीतही कपात होण्याची शक्यता वर्तविविण्यात येत आहे.

‘वन नेशन वन इलेक्शन’ म्हणजे नेमकं काय? कोविंद समितीकडून अहवाल सादर

तेल मार्केटिंग कंपन्यांनी देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत कपात केली आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून ही कपात लागू होणार आहे. इंधनाच्या किंमती कमी झाल्याने वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला फायदा होणार आहे. तसेच महागाई नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. वाहतूक क्षेत्राचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये लिटर होता. आता 104 रुपये पेट्रोल मिळणार आहे. तर मुंबईत डिझेल 94 रुपये लिटर दर होता. आता तो 92 रुपये झाला आहे.

चव्हाणांनी 25 वर्ष जोर लावून चिखलीकरांना विरोध केला… आता त्यांच्याच विजयासाठी मते मागावी लागणार!

गॅसदरात शंभर रुपयांनी कपात

नुकताच झालेल्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपाकाच्या गॅस किंमतीत शंभर रुपये कपात करण्याची घोषणा केली आहे. यामुळे 33 कोटी गॅसग्राहकांना फायदा झाला आहे. त्यात आता पेट्रोल व डिझेलच्या किंमतीतही कपात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी फायदा मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube