साताऱ्याच्या लेकीची ऐतिहासिक कामगिरी; 17 वर्षीय अदिती स्वामी बनली विश्वविजेता
World Archery Championships : साताऱ्याची अदिती गोपीचंद स्वामी हिने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णवेध घेतला आहे. साताऱ्यातील अदितीने तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीमध्ये अदितीने मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला 149-147 ने हरवून विश्वविजेता बनली आहे.(World Archery Championships aditi Swami NEW world champion satara )
त्याआधी अदितीने उपांत्य फेरीमध्ये ज्योती सुरेखा वेन्नमचा पराभव केला. अदिती ही तिरंदाजीमधील पहिली वैयक्तिक विश्वविजेता आहे. भारताचे हे या स्पर्धेमधील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक आहे.
#KheloIndia Athlete Aditi Gopichand Swami crowned World Champion at the #ArcheryWorldChampionships🇩🇪🏹
The 17 year old created history by defeating 🇲🇽's Andrea Beccera 149-147 in the Women's Individual Compound final and winning the glorious🥇for 🇮🇳
Heartiest congratulations! pic.twitter.com/polCvgfFUW
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2023
भारताच्या महिला संघाने शुक्रवारी सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय महिला संघाची विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानंतर आज अदितीने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली. अदितीच्या या सुवर्णकामगिरीमुळे साताऱ्याचा डंका जागतिक पातळीवर पोहोचला आहे.
आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर डोळे जागेवर ठेवणार नाही; आमदार राणेंचा इशारा
सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर अदितीने सांगितले की, माझ्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना आज फळ मिळाले आहे. मी व्यासपीठावर राष्ट्रगीत वाजवण्याची वाजवण्याची वाट पाहत होते. ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला देशासाठी पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकायचे असल्याचा निर्धारही यावेळी अदितीने केला आहे.