आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर डोळे जागेवर ठेवणार नाही; आमदार राणेंचा इशारा

आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर डोळे जागेवर ठेवणार नाही; आमदार राणेंचा इशारा

अहमदनगर – राज्यातील सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारावर चालणारे आहे. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर कुणाचे डोळे जागेवर ठेवणार नाही.. या राज्यात औरंगजेबाचे (Aurangzeb) स्टेटस कोणाला ठेवता येणार नाही. आमच्या सर्वांचा एकच बाप ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला आम्ही त्याच्या बापाकडे पाठवू, असा इशारा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला. (Nitesh Rane in Jan Acrosh Morcha Rahuri said government in the state is a Hindutva government)

राहुरीत सकल हिंदू समाजाच्या च्या नव्या पेठेतील आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. आमदार राणे पुढे म्हणाले, पोलिस दलात काही सडके आंबे आहेत. ते पोलिस दलाचे नाव आणि राज्य सरकारचे नाव खराब करीत आहेत. पोलिस अधिकारी स्वाती भोर यांचेवर थेट हल्ला करताना ते म्हणाले, हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांवर आपण खोटे गुन्हे दाखल करणार. त्यांना अमानुष त्रास देणार असाल तर आता तुम्हाला कोण वाचवणार? आपण हिंदूंवर जबरदस्ती करता. पण, हे सरकार भगव्या विचाराचे सरकार असल्यचां राणे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 7 ऑगस्टला जेजुरीत : वाहतुकीत मोठे बदल 

बांग्लादेशी आणि रोहींग्यांना एटीएसची मदत घेवून पाकिस्तानात पाठविणारे हे सरकार आहे. मोहरम निवडणुकीत दहशतवादी गुन्हेगाराच्या खांद्यावर पोलिस अधिकारी नाचतात असले प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत. हिंदूत्ववादी कार्यकर्ते आया-बहींणींना धीर देण्यासाठी उंबऱ्यात गेले होते. यात आमच्या काय चुका होत्या? पण, पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. ही सर्व माहिती गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवली असल्याचं राणे म्हणाले.

हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा धर्माचा नाही. आम्ही हिंदू म्हणून सर्व समाज एकत्र आलो आहोत. अशी संघटित ताकद हिंदू समाजाने सतत दाखविली पाहिजे. आम्ही हिंदू कधीच कोणाच्याही अंगावर जात नाही. या देशातील कोणतीही दंगल हिंदूंनी घडवलेली नाही. आपापला धर्म सांभाळावा. पण हिंदूना आडवे आलात तर तुमचा चौरंग करु. तुम्हाला दोन पायांवर घरी जावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

ते म्हणाले, आमच्या सणांना पर्यावरण संरक्षणाचे नियम लावतात. ते सर्व नियम केवल आमच्यासाठी लागू करता. गावोगावी प्रत्येक मशीदीवर पाच वेळा नमाजावेळी भोंगे लागले जातात. त्यांनाही नियम लागू आहेत. पण, ते नियम ते कधीच पाळत नाहीत. आपापला धर्म पाळा. त्याला आमची हरकत नाही. पण तुमच्या नमाज पठणाचा त्रास आम्हाला कशाला ? असा सवालही त्यांनी केला.

राज्यात माय-भगिनी सुरक्षित आहेत. हे सरकार काँग्रेस किंवा उध्दव ठाकरेंची सरकार नाही. हे छत्रपतींच्या विचारांचे सरकार आहे. आम्ही सर्व हिंदू समाज एकच आहोत. हजार हिंदूंकडे वाकड्या नजरेने कोणीही बघू शकणार नाही म्हणून हिंदू म्हणून आपण सतत जागरूक व संघटीत राहिले पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube