शनिशिंगणापूरनंतर शिर्डी संस्थानमध्ये घोटाळा, 47 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Sai Sansthan च्या साई आश्रम भक्तनिवासात मोठा घोटाळ्या प्रकरणी तब्बल 47 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल देखील करण्यात आला.

Letsupp (3)

Case against employees of Sai Sansthan 77 lakhs looted by mutual sale of electrical department materials : गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण तसेच बोगस नोकर भरतीवरून चर्चेत आले होते. त्यानंतर आता शिर्डी संस्थान चर्चेत आले आहे. कारण शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या साई आश्रम भक्त निवासात एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी तब्बल 47 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल देखील करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

साईबाबा मंदिराच्या साई आश्रम भक्तनिवासातील विद्युत विभागात लाखो रुपयांचा अपहार झाला. याबाबत 2022 साली सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता साईबाबा संस्थानच्या साई आश्रम भक्त निवासातील विद्युत विभागात असलेल्या साहित्याची परस्पर विक्री करून तब्बल 74 लाखांची लूट केली गेल्याचे समोर आले आहे.

बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना! छातीत गोळी लागलेला तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मात्र यावर संस्थानने कोणतीही कारवाई न केल्याने सामाजिक कार्यकर्ते काळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हायकोर्टाच्या खंडपीठामध्ये खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती.खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर संस्थांच्या सत्तेचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.

अभिनेता अक्षय कुमारला मोठा दिलासा! ‘त्या’ डीपफेक व्हिडीओवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

यामध्ये खाडगीर बी. डी विद्युत पर्यवेक्षक नामदेव जाधव, बाळासाहेब जाधव, वसंत गाडेकर, साहेबराव लंके, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, रवी घुले, रघुनाथ आहेर, संजय जोरी,  विजय रोहमारे, राजेंद्र जगताप, प्रकाश अभंग, राहुल इंगवले, सुनील धरम, एन आर शेख, दीपक तुरकने, राजेंद्र बोठे तर आउट सोर्स कर्मचारी साईनाथ इनामके, महेश मुंढरे, स्वप्नील जोंधळे, प्रमोद चिनी, किशोर महाले, उमाकांत तुपे, बाळू कुलकर्णी, अरुण जाधव, संजय बनसोडे, सागर जगताप, संजय कुमार हरणे, शरद मते, महेश मोरे, सागर खामकर, रामनाथ वाकचौरे, सोमनाथ पाचरे, विक्रम देवकर, सुभाष लांडगे, महेश गोंदकर, भानुदास बावके, विलास जेजुरकर, सागर ठोंबरे, गोरक्षनाथ काळे, सुनील वाघ, विलास भावसार, अनिल वाणी, सर्जेराव गोरे, पाराजी वाणी, साईनाथ आव्हाळे, योगेश रोहन, इत्यादी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

follow us