अभिनेता अक्षय कुमारला मोठा दिलासा! ‘त्या’ डीपफेक व्हिडीओवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याविरोधात तो न्यायालयात गेला होता.

सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे आज कोणाचाही फोटो किंवा व्हिडीओ सहज एडिट करता येतो. परंतु, या तंत्रज्ञानाचा गैरवापरही वाढला आहे आणि सर्वाधिक फटका बसतो तो सेलिब्रिटींना. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यात तो महर्षी वाल्मिकींच्या वेशात दिसत होता. या खोट्या व्हिडीओनंतर अक्षयने न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय कुमारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याच्या प्रतिमेचा व व्यक्तिमत्व हक्कांचा भंग करणारे डीपफेक व्हिडीओ आणि एआय कंटेंट तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, अशा सामग्रीचा प्रसार करणाऱ्या अज्ञात व्यक्ती आणि काही ई-कॉमर्स साइट्सविरुद्धही कारवाईचे निर्देश दिले आहेत.
Video : महाराष्ट्र पोलिसांचे बूट बदलणार; अक्षय कुमार करणार डिझाईन?, फडणवीसांची विनंती
माझा एआयच्या मदतीने तयार केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात मला महर्षी वाल्मिकी म्हणून दाखवलं आहे. परंतु, हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. माध्यमांनीही त्यावरून बातम्या केल्या, जे चुकीचं आहे. कृपया अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासा, असं अक्षय कुमारने याआधीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपली भूमिकेत स्पष्ट केलं होतं.
मुंबई उच्च न्यायालयाने युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना हा व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले. असे व्हिडिओ पुन्हा अपलोड होऊ नयेत यासाठी कडक देखरेख यंत्रणांनाही न्यायालयाने आदेश दिले.