‘पुनीत बालन ग्रुप’कडून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ३१ संगणकांची भेट

  • Written By: Published:
‘पुनीत बालन ग्रुप’कडून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ३१ संगणकांची भेट

पुणेः विद्यार्थ्यांना संगणकाविषयी गोडी वाढावी आणि या माध्यमातून विद्यार्थीदशेतच तो आधुनिक जगाशी जोडला जावा या हेतूने पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने (Punit Balan Group) पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेला ३१ संगणकांची भेट देण्यात आली. या डिजिटल लॅबचे उद्घाटन उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्या हस्ते करण्यात आले.

Lal Salaam Box Office: पहिल्याच दिवशी थलायवाच्या ‘लाल सलाम’ची छप्परफाड कमाई!

जगातील प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक कामाचा संबंध हा संगणकाशी जोडलेला असतो. केवळ लिहिण्या-वाचता येऊन आणि विविध पदव्या देणारे शिक्षण हे आता परिपूर्ण नाही तर आजच्या जगात खऱ्या अर्थाने तोच साक्षर आणि शिक्षित असतो ज्याला संगणकाचे ज्ञान असते. यादृष्टीनेच पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलला प्रसिद्ध युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ३१ संगणक भेट दिले आणि संगणकाचा समावेश असलेल्या या ‘डिजिटल लॅब’चे (Digital Lab) उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या मदतीबाबत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता राव यांनी ‘पुनीत बालन ग्रुप’चे आभार मानले आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत हेही उपस्थित होते.

Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya शाहिद अन् क्रितीचा चित्रपट पाहण्याची 5 कारणे!

पुनीत बालन म्हणाले, माझ्या आईनेही शिक्षिका म्हणून काम केलं. त्यांच्याकडूनच मला सामाजिक कामे करण्याची प्रेरणा मिळाली. म्हणूनच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना मला नेहमीच आनंद होतो. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण घेण्यास मोठी मदत होणार आहे. शिक्षकांनी आणि त्यांच्या पालकांनीही मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकण्यास आणि काम करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे आवडीप्रमाणे शिक्षण आणि काम मिळाल्यामुळे भावी पिढी घडण्यास मोठी मदत होणार आहे.

शिक्षण हा विकासाचा पाया असतो. म्हणून समाजाच्या सर्व स्तरातील मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तरच जागतिक स्पर्धेत आपण टिकाव धरू शकू. त्यासाठी शक्य तेथे शक्य ते सहकार्य करण्याचा ‘पुनीत बालन ग्रुप’चा नेहमीच प्रयत्न राहीलाय. याच भावनेतून न्यू इंग्लिश स्कूला संगणक देण्यात आले. याचा अधिकाधिक विद्यार्थी उपयोग करुन प्रगतीच्या दिशेने पाऊलं टाकतील, असा विश्वासही पुनीत बालन यांनी व्यक्त केला.

‘पुनीत बालन ग्रुप’ने नेहमीच सामाजिक दायित्वाची भूमिका सक्षमपणे निभावली आहे. गुणी आणि होतकरु खेळाडूंना आर्थिक मदत करून त्यांच्या गुणवत्तेला वाव देणे, राज्यातही आणि जम्मू-काश्मिरसारख्या दहशतग्रस्त भागातही शाळा चालवणे असे अनेक उपक्रम त्यांनी यापूर्वी राबवले आहेत. शिवाय पुण्यातील प्रसिद्ध शिवाजी मराठा सोसायटीच्या वसतिगृहासाठीही त्यांनी भरीव आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे नेहमीच कौतुक केले जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube