‘मी माफी मागते’, उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागेल, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

  • Written By: Published:
‘मी माफी मागते’, उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागेल, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Supriya Sule On Devendra Fadnavis :  राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आता आपल्या आपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तासगावमध्ये संजय काका (Sanjay Kaka) यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना राज्याचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर.आर. पाटील (R.R. Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

त्यांनी या सभेत बोलताना आर. आर. पाटील  यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची परवानगी देऊन केसाने गळा कापला असा गंभीर आरोप केला होता. तर या प्रकरणात भाष्य करत अजित पवार यांचे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी पाटील कुटुंबाची मी माफी मागीतल्याचीही माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आर.आर. पाटील हे माझ्या भावासारखे होते आणि त्यांचे 9 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. अजित पवार यांनी त्यांच्या निधनांतर असे आरोप करणे चुकीचे आहे. मला या आरोपांमुळे खूप दुःख झालं आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि त्यांना मी सॉरी म्हटले. कारण मला खूप दुःख झाले आहे. अजित पवार यांच्या या आरोपांमुळे आर. आर. पाटील यांच्या आई, त्यांची पत्नी, मुलं हयात आहेत. त्यांना या आरोपांमुळे काय वाटलं असेल याचा विचार करून मी त्यांना सॉरी म्हटलं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता की नाही याचा उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे असं देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महायुतीची सदा सरवणकरांना मोठी ऑफर, अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा होणार?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या सगळ्यांची उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागले. आरोपा विरोधात पत्र देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं. विरोध देवेंद्र फडणवीसांनी केला. गेल्या तीन- चार दिवसांत ज्या ज्या घटना झाल्यात, त्या सगळ्यांची उत्तरं देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागेल असं देखील माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

खांद्याला खांदा लावून काम केलं, पण माझंच तिकिट कापलं… हर्षदा काकडेंनी बोलून दाखवली खदखद

follow us
  • fb
  • instagram
  • youtube