खांद्याला खांदा लावून काम केलं, पण माझंच तिकीट कापलं… हर्षदा काकडेंनी बोलून दाखवली खदखद
Harshadatai Kakade Exclusive Interview : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीचं प्रमाण वाढलंय. दरम्यान शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी म्हणून हर्षदाताई काकडे (Harshad Kakade) यांचं नाव चर्चेत आहे. त्यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जनशक्ती विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हर्षदाताई काकडे यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याशी लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद साधला. त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली (Assembly Election) आहे. मतदारसंघाबाबत व्हिजन आणि राजकीय प्रवास याबाबत काकडे यांनी भूमिका व्यक्त केलीय.
बंडखोरी स्वभावातच आहे. राजकारणात आपल्यामुळे शिकले. वडिल कॉंग्रेस विचारांचे होते, पण बंडखोर होते. सत्यासोबत राहण्याचा त्यांचा स्वभाव होता, असं हर्षदाताई काकडे म्हणाल्या आहेत. 25 वर्ष जिल्हा परिषद गटात निवडणून आलंय. 2009 पासून ठरवलं होतं की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं आपण करत आहोत, त्या अनुषंगाने वरच्या राजकारणात गेलं पाहिजे. मग भाजपची मुलाखत दिली, तेव्हा अचानक ढाकणेंची एन्ट्री झाली. तेव्हा भाजपने सांगितलं की, जोपर्यंत ढाकणे साहेब आहेत, तोपर्यंत त्यांनाच तिकीट देवू. तुम्हाला विधानसभेचं तिकीट देता येणार नाही, तेव्हाच बंडखोरी केली. परंतु तयारी नसल्याने जनतेने अपक्ष स्वीकारलं नाही.
सोलापुरात अजित पवारांना मोठा धक्का! निरंजन भूमकरांसह 15 नगरसेवकांचा शरद पवार गटात प्रवेश
2014 मध्ये ढाकणेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर काकडे साहेबांना विधानसभेचं तिकीट डिक्लेर झालं, एबी फॉर्म दिला गेला होता. चंद्रशेखर कदम यांनी सांगितल्याप्रमाणे सभेची तयारी केली होती. शेवगाव-पाथर्डीत आमच्या घरासमोर सभा चालू होती. पंधरा वीस हजार माणसं जमलेली होती, सभा चालू होती. त्यानंतर अचानक राष्ट्रवादीकडून एकाजणाचा फोन आला की, तुमचं तिकीट गेलंय. मोनिका राजळे फॉर्म भरत आहे. मुंडेसाहेबांना श्रद्धांजली म्हणून भाजपात राहण्याचा निर्णय काकडे साहेबांनी घेतला होता.
अजितदादांनी तासगावमध्ये येऊन आरोप प्रत्यारोप करावे पण…; आबांच्या लेकीचं भावनिक आवाहन
आम्ही मोनिका राजळेंसोबत राहिलो. खांद्याला खांदा लावून काम केलं. परंतु त्यांनी नंतर माझं 2017 जिल्हा परिषदेचं तिकीट नाकारलं. मग बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली, जनतेने देखील स्वीकारलं. या सगळ्याची परतफेड करण्याची वेळ आलीय. लोकांच्याही मनात आहे, ते बोलून दाखवत आहेत की तुमच्यावर अन्याय झालाय. मी लोकांना फक्त 2014 आणि 2017ची आठवण करून देत आहे. आम्ही 24 तास जनतेची कामं करत आहे. जर आम्ही त्याच एका पक्षावर अवलंबून राहिलो असतो, तर वेगळं चित्र असतं. दोन्ही तालुक्यात आज रस्ता, वीज आणि पाणी हे मुलभूत प्रश्न असल्याचं हर्षदाताई काकडे यांनी म्हटलंय.
मी देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि संजय राऊतांना भेटले. त्यांना बायोडाटा दिला अन् मीच निवडणून येणार, असं सांगितलं. आम्ही रात्रंदिवस जनतेच्या सेवेत आहोत, त्यामुळे मला हा विश्वास आहे, असं हर्षदाताई काकडे लेट्सअप मराठीसोबत बोलताना म्हणाल्या आहेत. समाजात काम करताना चारित्र्य आणि संस्कार सांभाळायचे, असं साहेबांनी सांगितलं होतं. त्यांनी माझ्या एकटीवर जबाबदारी सोपवली. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही, असं शेवगावमध्ये सुत्र आहे. त्यामुळे सुरूवातीला काम करताना काही अडचणी जाणवल्याचं हर्षदाताई म्हणाल्या आहेत.