अजितदादांनी तासगावमध्ये येऊन आरोप प्रत्यारोप करावे पण…; आबांच्या लेकीचं भावनिक आवाहन

अजितदादांच्या आर. आर. पाटलांवरील गंभीर आरोपांनंतर विरोधकांकडून दादांवर चहूबाजुने टीका केली जात आहे.

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 10 31T084011.657

R. R. Patil Doughtier Reaction On Ajit Pawar Allegation : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगलीतील सभेत दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अजितदादांच्या या विधानानंतर विरोधकांकडून दादांवर चहूबाजुने टीका केली जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये आर. आर. पाटील (R.R. Patil) यांच्या लेकीनं अजितदादांना वडिलकीचा मान देत एक भावनिक आवाहन केले आहे.

अजित पवारांकडून सिंचन घोटाळा प्रकरणी गौप्यस्फोट, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली A टू Z कहाणी

काय म्हणाल्या स्मिता पाटील?

अजितदादांमध्ये आम्ही आमच्या आर आर आबांना पाहतो. अशावेळी आबा हयात नसताना वडीलधाऱ्या दादांनी केलेल्या वक्तव्यामुळं अतीव दुःख झाल्याचे आबांच्या लेकीनं म्हटलं आहे. परंतु, वडीलधाऱ्या दादांचा यामागे काय हेतू होता, हे मी त्यांना मुळीच विचारू शकत नाही.

या गोष्टीची खबरदारी घ्यावी

पुढे बोलताना आबांची लेक म्हणाली की, दादांनी आमचं पालकत्व स्वीकारल्यानं ते आम्हाला आबांसारखे आहेत. ते असं वक्तव्य करतील याचा आम्ही कधीचं विचार केला नव्हता. मात्र यापुढं त्यांच्या मुलाप्रमाणे असलेल्या रोहित पाटलांविरोधात जेव्हा दादा तासगावमध्ये येऊन प्रचार करतील. तेव्हा मात्र, दादांनी आरोप नक्कीच करावे पण, केलेल्या आरोपांचं खंडन करणारी व्यक्ती हयात आहे की नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच त्यांनी तथ्य असणारेचं आरोप करावेत, असे आवाहन आबांची लेक स्मिता पाटील यांनी केली आहे.

सिंचन घोटाळ्यातील नेता योग्य जागी; राऊतांकडून अमित शाह टार्गेट

अजित पवारांनी काय केले होते आरोप?

सांगलीत (दि.30) पार पडलेल्या सभेत अजितदादांनी दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणात माझ्या विरोधात कारवाईची फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणाऱ्या आबांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केल्याचं अजितदादा म्हणाले होते.

follow us