सोलापुरात अजित पवारांना मोठा धक्का! निरंजन भूमकरांसह 15 नगरसेवकांचा शरद पवार गटात प्रवेश
NCP Ajit Pawar Group 15 corporators joined Sharad Pawar group : सोलापुरातुन (Solapur) एक मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटातील निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केलाय. सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय.
शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बाग येथे भूमकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. निरंजन भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे (Assembly Election) उपनगराध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. वैराग नगरपंचायतीवर निरंजन भूमकर यांची एक हाती सत्ता आहे. अजित पवार गटाला सोलापुरात हा मोठा धक्का मानला जातोय.
तु बिनधास्त लढ, संपूर्ण समाज तुझ्या पाठिशी; जरांगेंच्या भेटींनंतर शिंदेंच्या शिलेदाराचा दावा पण…
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगात राजकीय घडामोडी घडत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांत मोठं नाराजीनाट्य पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणावर बंडखोरी देखील पाहायला मिळतेय. तिकीट मिळालं नाही, आपल्या उमेदवाराला पक्षाने तिकीट दिलं नाही. अशा अनेक कारणांमुळे नेतेमंडळीपासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
राष्ट्रवादीची भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट, मी किंवा राष्ट्रवादीने…; मलिकांनी थेट सांगितलं…
अशातच सोलापुरात अजित पवार गटात मोठी बंडखोरी झाली आहे. निरंजन भूमकर (Niranjan Bhumkar) यांच्यासह 15 नगरसेवकांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. आता निवडणुका तोंडावर आहेत. याचा परिणाम मतदानावर होणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. सोलापुरात निरंजन भूमकरांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढली आहे.