तु बिनधास्त लढ, संपूर्ण समाज तुझ्या पाठिशी; जरांगेंच्या भेटींनंतर शिंदेंच्या शिलेदाराचा दावा पण…

तु बिनधास्त लढ, संपूर्ण समाज तुझ्या पाठिशी; जरांगेंच्या भेटींनंतर शिंदेंच्या शिलेदाराचा दावा पण…

Suhas Kande Meet Manoj Jarange : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी जरांगे यांची आज अंतरवाली सराटी येथे जाऊनभेट घेतलीय. आज सायंकाळी कांदे आणि जरांगे (Manoj Jarange) यांची भेट झालीय. विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना या भेटीला अत्यंत महत्व आलं आहे. या भेटीदरम्यान कांदे आणि जरांगे यांच्यात राजकीय खलबतं देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.

सुहास कांदे यंदा महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु त्यांच्यावर काल गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांनी मराठा समाजाचे नेते शेखर पगार आणि समीर भुजबळांचे समन्वयक विनोद शेलार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात (Manoj Jarange News) आलाय. नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. सुहास कांदे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकी च्या काळातच कांदेंच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे.

जरांगेंनी यांनी म्हटलंय की, तु बिनधास्त लढ, संपूर्ण समाज तुझ्या पाठिशी आहे, असं सुहास कांदे यांनी म्हटलंय. तर सुहास कांदेंना अजून पाठिंबा दिलेला नाही, आमचा निर्णय व्हायचाय. असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मी एकालाही पाठिंबा दिलेला नाही. ते आमचे विरोधक नाही अन् शत्रुही नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Vidhansabha Election : सुप्रिया सुळे CM होऊ शकतात का? आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले…

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात (Assembly Election) उतवरणार असं जाहीर केलं होतं. मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे मराठा समाजाच्या बैठका आणि मुलाखती घेत आहेत. मराठा आंदोलकांची 24-24 तास अंतरवालीत गर्दी आहे. विविध पक्षाचे नेतेमंडळी मराठा मतांसाठी जरांगेंची भेट घेत असल्याचं दिसतंय. जरांगे यांना भेटण्यासाठी येणारे नेतेमंडळी रात्री उशिरापर्यंत चर्चा करतात. त्यामुळं मनोज जरांगे यांची झोप होत नसल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं देखील समोर आलं होतं.

राष्ट्रवादीची भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट, मी किंवा राष्ट्रवादीने…; मलिकांनी थेट सांगितलं…————————

यामुळे मनोज जरांगे यांना अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागला. त्याचबरोबर ताप देखील आला होता. काल डॉक्टरांनी जरांगे यांच्यावर उपचार केलेत. दरम्यान या रणधुमाळीत मनोज जरांगे यांच्या भेटीला सुहास कांदे पोहोचले होते. त्यांच्यावर मराठा समाजाच्या नेत्यांनी कालच गुन्हा दाखल केलाय. अशातच त्यांनी जरांगे यांची भेट घेतलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात मनोज जरांगे आणि सुहास कांदे यांच्या भेटीची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube