Vidhansabha Election : सुप्रिया सुळे CM होऊ शकतात का? आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले…

  • Written By: Published:
Vidhansabha Election : सुप्रिया सुळे CM होऊ शकतात का? आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले…

Aditya Thackeray : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपापले उमेदवार जाहीर केले. मात्र, कोणीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जातंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाष्य केलं.

ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, विधानसभेसाठी ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे  होऊ शकतात, असं सूचक विदान त्यांनी केलं.

एबीपी न्यूजच्या शिखर संमेलनात आदित्य सहभागी झाले होते. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकतात का ? असं विचारलं असता ते म्हणाले की, जनताच याचा निर्णय घेईल. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणाराच मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लैंगिक समानतेवर विश्वास आहे, असं ते म्हणाले.

‘चिन्ह कष्टानं कमावलेलं, ढापून मिळवलेलं नाही’, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला 

पुढं ते म्हणाले की, आतापर्यंत महिला मुख्यमंत्री झाल्या किंवा नाही झाल्या हे होत राहतं. हा राजकारणाचा भाग झाला. मात्र सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे. भाजपची संस्कृती महाराष्ट्रावर लादली जातेय. पण आता मुख्यमंत्रीपदाबाबत जनता ठरवेन. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणारा मुख्यमंत्री होणार, असं ते म्हणाले.

महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, आमच्या सर्व सर्वेक्षणात मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंवर अनेकांनी विश्वास आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, डॉक्टर, आशा सेविका यांच्यासह अनेक उद्योगपतींचाही आमच्या सरकारवर विश्वास होता. त्यांना माहित होतं की, हा माणूस आम्हाला फसवणार नाही, आम्हाला लुटणार नाही, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रात जे घडले ते इतरत्र कुठेही घडले नाही. आमचे सर्व प्रकल्प गुजरातला दिले जात आहेत आणि आमचं सरकार फक्त त्या प्रकल्पांना टाटा करतंय, असं म्हणत ही लढाई आमच्या अस्तित्वाची नाही. पक्ष खरा की खोटा याची नाही. ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाची आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची ही लढाई आहे, महाराष्ट्राला लुटणाऱ्या राजवटीला हटवायचे आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube