‘मिताली राजसोबत लग्न करणार …’ शिखर धवनने शेअर केला ‘तो’ किस्सा

‘मिताली राजसोबत लग्न करणार …’ शिखर धवनने शेअर केला ‘तो’ किस्सा

Shikhar Dhawan Marriage Rumours : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) स्टार खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) कधी आपल्या अप्रतिम फलंदाजीमुळे तर कधी वैयक्तिक गोष्टीमुळे सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत राहतो. नुकतंच त्याने जिओ सिनेमाच्या एका शो मध्ये स्वतःबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. यानंतर तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

जिओ सिनेमाच्या शो ‘धवन करेंगे’ मध्ये माजी भारतीय महिला खेळाडू मिताली राज (Mithali Raj) गेस्ट म्हणून आली होती. यावेळी शिखर धवनने एक मनोरंजक खुलासा करत मितालीसोबतच्या अफवा असलेल्या नात्याबद्दल भाष्य केले.

शोमध्ये शिखर म्हणाला, काही दिवसापूर्वी मी ऐकले की मी मिताली राजसोबत लग्न करणार आहे. हे ऐकून दोघेही हसायला लागले. या शोमध्ये मिताली राजने गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. यादरम्यान शिखरने मितालीला क्रिकेट आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले.

महिला क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणारी मिताली राजने महिला वनडेत सर्वाधिक धावा केले आहे. 2022 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्राइस्टचर्चमध्ये मितालीने भारतातर्फे शेवटचा सामना खेळला होता. निवृत्तीनंतर मिताली कॉमेंट्री आणि मेंटरशिपमध्ये आपली दुसरी इनिंग सुरू केली आहे. तर 2012 मध्ये आयशा मुखर्जीसोबत शिखर धवनने लग्न केले होते मात्र, आता दोघांचा घटस्फोट झाला असून दोघेही कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत.

Kangana Ranaut : कंगना पुन्हा चर्चेत! म्हणाली, ‘प्रत्येक नवीन हिरोईनला दाऊदकडे …’

तर या शोमध्ये शिखर धवनने ऋषभ पंतचे कौतुक केले, तो म्हणाला, ज्या प्रकारे त्याने कार अपघातानंतर पुनरागमन केले आणि भारतीय संघात स्थान मिळवले ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे. मला त्यांचा अभिमान आहे. असं शिखर धवन म्हणाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज