मितालीपासून रॉजर फेडररपर्यंत ‘या’ दिग्गजांचा कारकिर्दीला निरोप…

मितालीपासून रॉजर फेडररपर्यंत ‘या’ दिग्गजांचा कारकिर्दीला निरोप…

नवी दिल्ली : 2022 मध्ये क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी निवृत्तीची घोषणा केली. वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीला निरोप दिला.

सेरेनाने यावर्षी ऑगस्टमध्ये निवृत्तीचे संकेत दिले होते. यानंतर यूएस ओपन ही त्याची शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा मानली गेली. या स्पर्धेतील पराभवानंतर ती रडतच कोर्टाबाहेर गेली. सेरेनाने तिच्या कारकिर्दीत 23 ग्रँडस्लॅम एकेरी आणि तिची मोठी बहीण व्हीनससह 14 दुहेरी विजेतेपदे जिंकली.

झुलन गोस्वामीनेही याच वर्षी सप्टेंबरमध्ये निवृत्ती जाहीर केली होती. तिने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण सामना खेळला आणि त्याच संघाविरुद्ध शेवटचा सामनाही खेळला. तिने12 कसोटी सामन्यात एकूण 44 बळी घेतले. तर 204 एकदिवसीय सामने खेळले आणि यामध्ये 255 विकेट घेतल्या. 68 सामन्यांत 56 बळी घेतले.

फॉर्म्युला वन सर्किटवर अधिराज्य गाजवणारा जर्मनीचा ड्रायव्हर सेबॅस्टियन व्हेटेल यानेही यावर्षी आपल्या कारकिर्दीला अलविदा केला. वेटेलने त्याच्या कारकिर्दीत 53 विजय मिळवले, ज्यामध्ये रेड बुल संघासाठी 38 आणि फेरारीसोबत राहताना 14 विजय नोंदवले गेले. त्याने 2008 मध्ये F1 सर्किटमध्ये पदार्पण केले.

युवा टेनिस स्टार अ‍ॅशले बार्टीने अचानक निवृत्ती जाहीर केली. तिने घोषणा केली तेव्हा ती नंबर वन टेनिसपटू होती. बार्टी सलग 114 आठवडे WTA क्रमवारीत नंबर 1 खेळाडू होती. अ‍ॅश्ले बार्टीच्या नावावरही तीन ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.

टेनिस दिग्गज रॉजर फेडररने 2022 च्या लेव्हर कपने आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. शेवटच्या सामन्यात राफेल नदाल त्याचा साथीदार बनला, जो संपूर्ण वेळ फेडररसाठी अश्रू ढाळत राहिला. फेडररने आपल्या कारकिर्दीत 20 ग्रँडस्लॅम जिंकले. त्याच्या निवृत्तीमुळे चाहते खूप दु:खी झाले होते.

मिताली राजने या वर्षी 8 जून रोजी तिची प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्द संपवली. मितालीने 2019 मध्ये टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतली. 1999 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी तिने टीम इंडियामध्ये पदार्पण केले होते. वनडेमध्ये ती जगातील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने 7 शतके आणि 64 अर्धशतकांच्या जोरावर 7 हजार 805 धावा करत आपल्या कारकिर्दीचा शेवट केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube