देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप कराल तर; जरांगे व विरोधकांना शेलारांचा थेट इशारा

  • Written By: Published:
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप कराल तर; जरांगे व विरोधकांना शेलारांचा थेट इशारा

Ashish Shelar On Manoj Jarange Devendra Fadnavis allegation : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) माझा बळी घ्यायचा असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. त्याचबरोबर ते आता अंतरवली सराटी येथून मुंबईला फडणवीस यांच्या सरकारी बंगल्याकडे निघाले आहेत. फडणवीस यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर भाजपचे नेतेही जरांगेंवर भडकले आहेत. ते जरांगेंना सुनावत आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही जरांगेंना जोरदार फटकारले आहे.

‘मला संपवण्याचा डाव’ हे बिनबुडाचं अन् धादांत खोटं; फडणवीसांनी आरोप फेटाळले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐकेरी उल्लेख झाला त्याचे समर्थनच होऊ शकत नाही. उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोलले पाहिजे, देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास हा कुठे गैर पद्धतीने वितुष्ट निर्माण करणारा नाही. संविधान आणि कायदा याच्या पलीकडे कधी ते बोलतच नाहीत. म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे करण्यात आलेले बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो.

तुझ्यात किती दम आहे तो बघायचाय; मनोज जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर ‘वार’

मुळामध्ये राजकारण राजकीय पक्षाने खेळावं, कोणत्याही राजकीय पक्षाने हा प्रयत्न करू नये की, अशा पद्धतीने समाजामध्ये वितृष्ठ निर्माण होईल, आणि म्हणून या सगळ्यात राजकीय वास येण्याची स्थिती का निर्माण झाली ? याचा विचार मराठा समाज नक्की करतो, असे शेलार म्हणाले.

मला असे वाटते ज्यांनी आतापर्यंत टिकणारे आरक्षण मुख्यमंत्री पदाच्या काळात दिले. ज्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर आणि उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर दहा टक्क्यांचा आरक्षण दिले, तसेच गृहमंत्री म्हणून सुद्धा आपली जबाबदारी योग्य पध्दतीने बजावत आहेत, त्यांच्यावर आरोप करणे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. आम्ही ते फेटाळतो. याच्यात राजकारण जर कोणी करू पाहत असेल, तर त्याचा राजकीय सामना करायला आम्ही समर्थ आहोत, असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. मराठा समाजाला न्यायिक, टिकणारे आरक्षण देणाऱ्या देवेंद्रजींवर असे बिन बुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही. ते असमर्थनीय आहेत. मराठा समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका सरकारने घेतली आहे, असे शेलार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज