‘…म्हणून पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखतयं’; आशिष शेलारांनी सांगितलं कारण..,

‘…म्हणून पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखतयं’; आशिष शेलारांनी सांगितलं कारण..,

Aashish Shelar Vs Aaditya Thackeray : ‘वाघनखं भाजप आणतंय म्हणून पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखतयं, अशी जळजळीत टीका भाजपचे आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी ठाकरे कुटुंबियांवर(Thackeray) केली आहे. शिवरायांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेले वाघनखं लंडनहून भारतात आणण्यात येणार आहेत. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये घमासान सुरु आहे. आदित्य ठाकरेंनी(Aaditya Thackeray) या वाघनखांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आशिष शेलारांनी ठाकरे कुटुंबियांवर ताशेरे ओढले आहेत.

Parineeti-Raghav Wedding : ‘राघनीती’चा क्रिकेट अंदाज; कपलसह फॅमिलीने घेतला आनंद, पाहा फोटो

आशिष शेलार म्हणाले, ही वाघनख भाजप आणत आहेत, त्यामुळे पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखत आहेत. ठाकरे गटाचे लोकं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या परिवाराबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर प्रश्न हे कुठल्या मतांसाठी उपस्थित करत आहेत, असा खोचक सवालही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान मोदी ‘विश्वगुरू’, पण खलिस्तानवाद्यांचा… ठाकरे गटाचा निशाणा

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर हे प्रश्नचिन्ह विचारत आहेत. तुम्हाला आदित्य ठाकरे कुठली मते मिळवायची आहे, वडेट्टीवार तुमचे सरकार मागील 50 वर्ष सत्तेत होते आणि तुम्ही प्रश्न विचारत आहेत. हिरवी चादर स्वतः बरोबर तुम्ही आदित्य ठाकरे यांना देखील हिरवी चादर दिली , तुमची बदललेली भूमिका ही केवळ मतांसाठीच असल्याचा घणाघात शेलारांनी यावेळी केला आहे.

जुन्नर दौऱ्यात शरद पवारांची गोळाबेरीज; दिवंगत काँग्रेस नेत्याच्या लेकाला उमेदवारी मिळण्याची चर्चा

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
महाराष्ट्रात येत असलेली वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत? याचा खुलासा सरकारने करावा, इंग्लंडहून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं येत आहेत. परंतु ही वाघनखं कायमस्वरुपी आपल्याकडे राहणार आहेत का? याबाबत प्रश्नच आहे. कारण ती वाघनखं केवळ तीन वर्षांसाठी आपल्याकडे राहतील, असंही जीआरमध्ये म्हटलं. मुळात ती शिवकालीन आहेत का?

अरविंद सावंत मोदींच्या पोस्टरमुळे जिंकले :
अरविद सावंत यांचा पराभव ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मागे ते आमच्या मेहरबानीने जिंकले. मेहेरबानी हा शब्द अंडरलाईन करून सांगतो. त्यांचे कर्तृत्व नव्हते तरी मोदींमुळे अरविंद सावंत जिंकले. अरविंद सावंत मोदींचे पोस्टर घेऊन फिरले म्हणून जिंकले, असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube