Parineeti-Raghav Wedding : ‘राघनीती’चा क्रिकेट अंदाज; कपलसह फॅमिलीने घेतला आनंद, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्डा (Raghav Chadda) यांनी साता जन्माच्या गाठी बांधल्या आहेत.

या लग्नानंतर (Parineeti-Raghav Wedding) दोन्ही कुटुंब त्यांच्या विविध परंपरांचा आनंद घेताना दिसत आहेत. तसेच लग्नानंतर या दोन्ही कुटुंबांनी क्रिकेट आणि इतर खेळांचा देखील आनंद घेतला

या क्रिकेटच्या खेळाचा व्हिडीओ परिणीतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

यामध्ये परिणीती चोप्राची फॅमिली आणि राघव चढ्ढा यांची फॅमिली अशा दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या.

या खेळाचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये या कुटुंबांनी या खेळाचा आनंद घेतल्याचं दिसत आहे.

या फोटोंना कॅप्शन देताना परिणीतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच तिने यावेळी कोणकोणते खेळ खेळले गेले आहेत. ते देखील सांगितले आहे.

यामध्ये संगीत खुर्ची, तीन पायांची शर्यत, लिंबू चमचा आणि क्रिकेट हे खेळ खेळले गेले

तर या खेळांच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. परिणीतीने ब्राइड लिहिलेला केशरी टी-शर्ट घातला आहे. राघव यांनी ग्रुम लिहिलेला ब्लू टी-शर्ट घातला आहे.
