Devendra Fadnavis : अजितदादांमुळे शरद पवार रायगडावर; आता ‘तुतारी’ किती वाजते बघायचे
Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी’ पक्षचिन्ह देण्यात आलं. निवडणुकीच्या तोंडावर या पक्षचिन्हाचं अनावरण आज रायगडावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. राज्याच्या राजकारणातील आजची ही ठळक घडामोड. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया देत शरद पवार यांना टोला लगावला आहे. आज चाळीस वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले असून अजित पवारांनाच याचं क्रेडिट द्यावं लागेल. आता तुतारी कधी, कुठे आणि किती वाजते हे भविष्यात दिसेल, अशा मोजक्या शब्दांत फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
Devendra Fadnavis : ‘दहा वर्षांचा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है’ फडणवीसांचं सूचक वक्तव्य
राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून रायगडावर तुतारी या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शरद पवार गटाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने श्री @PawarSpeaks यांना रायगडाची आठवण आली आहे.
सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग…— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 24, 2024
दरम्यान, महाराष्ट्र भाजपानेही शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने शरद पवार यांना रायगडाची आठवण आली आहे. सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे करावे लागत आहे. 40 वर्षात शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण आली नाही. कधीही दुर्गसंवर्धनासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले नाहीत. आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत शरद पवारांना रायगडावर यायला वेळ नव्हता, अशा शब्दांत भाजपने शरद पवार यांच्यावर टीका केली.