‘तुतारी’ची रायगडावर गर्जना ! महाराजांची प्रेरणा घेऊन सेवा करूयात, शरद पवारांची भावनिक साद
Sharad Pawar On Raigad: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar ) पक्षाच्या नव्या चिन्हाचं आज अनावरण होत आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे. त्याआधी किल्ले रायगडावर (Raigad) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. यानंतर शरद पवारांनी थेट जनतेशी संवाद साधत असताना तुतारी जनतेला प्रेरणा देणार असल्याची थेट प्रतिक्रिया दिली आहे.
सध्याचा राज्याच्या राजकारणात संघर्ष हा वैचारिक आहे. या देशामध्ये अनेक राजे- महाराजे होऊन गेले आहेत, काही संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा हा फक्त एकच राजा होता. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज … सध्या राज्याच्या राजकारणात अनेक अडचणी वाढतील अशी शक्यता वर्तवला जात आहे. शिवछत्रपतींचे राज्य सर्व सामान्यांचे सेवा करणारे राज्य आहे. आज राज्याची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा जनतेचे राज्य यावं लागणार आहे, असं यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.
महाराजांची प्रेरणा घेऊन सेवा करूयात: निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला शरद पवारांच्या हातामध्ये तुतारी चिन्ह दिले आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी असणार आहे. तुमच्या संघर्षातून, त्याग आणि यशातून मिळणार असा विश्वास त्यांनी यावेळी दाखवला आहे आहे. या ऐतिसाहिक भूमीमध्ये आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन राज्यातील जनतेची सेवा करुया”, असे आवाहन शरद पवारांनी यावेळी केला आहे.
शरद पवार पालखीतून थेट गडावर दाखल: तुतारी हे आपल्या राज्याचे ऐतिहासिक वाद्य समजले जाते. यामुळे पक्षाला ऐतिहासिक चिन्ह मिळाले असल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे. आणि जवळपास ४० वर्षांनंतर शरद पवार किल्ले रायगडावर आज आले आहेत.
“क्रॅक”ची बॉक्स ऑफिसवर मंद सुरुवात, पहिल्या दिवशी चित्रपटाने केली ‘इतकी’ कमाई
महाराष्ट्राच्या काळजातील तुतारी आता राज्याची स्वाभिमानाची ललकारी होईल. शरद पवारांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राहण्यासाठी प्रयत्नशील राहील असं खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हणाले.
दरम्यान, सेना जेव्हा युद्धाला निघत असते, त्यावेळेस वाजवलं जाणार वाद्य म्हणजे तुतारी आहे, आणि आपण जिंकल्यानंतर युद्धावरून जेव्हा परत येतो तेव्हादेखील तुतारीचं वाजवली जात असते. निवडणुकीच्या युद्धात उतरत असताना ८४ वर्षाच्या आमच्या योद्धाला तुतारी हातात देऊन शुभ संकेत निवडणूक आयोगाने दिल्याचा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी यावेळी व्यक्त केला आहे.