Sharad Pawar : आयोगाने दिली ‘तुतारी’; पक्ष म्हणतो, ‘आम्ही रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज!’

Sharad Pawar : आयोगाने दिली ‘तुतारी’; पक्ष म्हणतो, ‘आम्ही रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज!’

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commisson) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगान ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला दिलं. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या आदेशाची माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकात हे नवे पक्षचिन्ह घेऊन शरद पवारांचा पक्ष लोकांत जाणार आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला मिळालं. त्यामुळे शरद पवार यांनी पक्षांसाठी वेगळं नाव आणि चिन्ह आयोगाला सुचवलं होतं. तीन चिन्ह सुचवण्यात आली होती. पक्षाचं नाव आगामी राज्यसभा निवडणुकीपुरतं होतं त्यामुळे पक्षाला चिन्ह देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे शरद पवार गटाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले होते.

Sharad Pawar : मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांच्या मनात शंका; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न सुटला तर..

न्यायालयात सुनावणी झाली. पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आठवडाभरात आयोगाने चिन्ह द्यावे असे आदेश देण्यात आले. यानंतर शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते. परंतु, आयोगाने तिन्ही पर्याय नाकारत तुतारी हे चिन्ह शरद पवार यांच्या पक्षाला दिले. आता सुप्रीम कोर्टाकडून पुढील आदेश येईपर्यंत हेच पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहिल.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने सोशल मीडियावर कवी केशवसूत यांची एक कविता शेअर केली आहे. “एक तुतारी द्या मज आणुनि फुंकीन जी मी स्वप्राणाने भेदून टाकिन सगळी गगने दीर्घ तिच्या या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!” असे या कवितेचे शब्द आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्तालाही कानठळ्या बसवल्या होत्या. तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारसाठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांना खा. शरदचंद्र पवार यांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरता सज्ज आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Sharad Pawar : ‘भावनिक आवाहनाची गरज नाही, लोक आम्हाला’.. शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज