Sharad Pawar : ‘भावनिक आवाहनाची गरज नाही, लोक आम्हाला’.. शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

Sharad Pawar : ‘भावनिक आवाहनाची गरज नाही, लोक आम्हाला’.. शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

Sharad Pawar replies Ajit Pawar Statement : भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. भावनिक होऊ नका. आपल्या उमेदवारालाच विजयी करा. तर मी विधानसभेला उभा राहिल असे विधान काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील मेळाव्यात केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्हाला भावनिक आवाहन करण्याची काहीच गरज वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार आज बारामतीत होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अजित पवारांना जोरदार टोला लगावला. आमच्याकडून कोणतेही भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. बारामती मतदारसंघात वर्षीनुवर्षे लोक आम्हाला ओळखतात. त्यामुळे आम्हाला काही भावनिक आवाहन करण्याची गरज वाटत नाही. परंतु, विरोधकांची भाषण करण्याची पद्धत काहीतरी वेगळंच सुचवत आहे, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : ईडीच्या कारवाईत एकही भाजपाचा नेता नाही; शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली

कुटुंबातील सर्वजण माझ्याविरोधात गेले आहेत. माझ्याविरोधात प्रचार करतील मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होईल असेही अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी पलटवार केला. निवडणुकीत मतदारांची साथ मागणं उमेदवाराचा अधिकार आहे. पण, कुटुंबातील सगळे लोक एका बाजूला आणि मीच एकटा पडलोय असं सांगणं म्हणजे भावनात्मक भूमिका मांडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरही शरद पवारांनी भाष्य केले. असा निर्णय होईल अशी खात्री होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्या पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही आणि ती ठेवतील असही वाटत नव्हतं. दोन्ही बाजूंची पात्रता अशा प्रकारचा निर्णय त्यांनी आधी देखील घेतला होता. शिवसेनेबाबत जो निर्णय घेतला होता त्याच निर्णयाची पुनरावृत्ती केली. पक्ष आणि चिन्ह या दोन्हींची भूमिका निवडणूक आयोग आणि अध्यक्षांनी घेतली. आमच्या मते आम्हा लोकांना न्याय मिळाला नाही. यात पदाचा गैरवापर कसा होतो हे यातून दिसून आले. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहोत.

सुप्रीम कोर्टाला आमची विनंती आहे की निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा. पक्ष आणि चिन्ह हे दुसऱ्या कुणाला देणार हे या अगोदर घडलं नव्हतं. सगळ्या देशाला माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला. अन्याय करणारा हा निर्णय असून आता सुप्रीम कोर्टाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही.

‘राष्ट्रवादी अजित पवारांची अन् अजित पवार भाजपाचे’ नार्वेकरांच्या निकालावर वडेट्टीवारांचा खोचक टोला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube