तुझ्यात किती दम आहे तो बघायचाय; मनोज जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर ‘वार’

  • Written By: Published:
तुझ्यात किती दम आहे तो बघायचाय; मनोज जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर ‘वार’

Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मनोज जरांगे मुंबईत >देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर उपोषण करण्यासाठी निघाले असताना त्यांना भांबेरा गावातील ग्रामस्थांना अडवून उपचार घेण्यास सांगितले आहे. त्या ठिकाणी बोलतानाही >मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेत. तसेच फडणवीसांमध्ये किती दम आहे तो बघायचा आहे, असे चॅलेंजही जरांगे यांनी दिले आहे. मात्र फडणवीसांवर बोलताना जरांगे यांनी एेकरी भाषा वापरली. तसेच त्यांची बोलताना जीभही घसरली.


मनोज जरांगेंचा तोल सुटत चाललाय, त्यांचा बोलवता धनी….; नरेंद्र पाटलांची जरांगेंवर टीका

जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी बामणी कावा केला आहे. केवळ दहा टक्के आरक्षण दिले आहे. आरक्षणावरून मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न फडणवीसांचा आहे. त्याच्यामध्ये किती दम आहे तो बघायचा आहे. त्याने आती केले आहे. त्याला झेपत नाही म्हणून कोर्टामध्ये गेला. अॅड. गुणरत्न सदावर्तेंना याचिका दाखल करायला लावली. त्याला देवेंद्र फडणवीस यांनीच कोर्टात जायला लावले आहे. त्याच्या अडून मला उपचार घ्यायला लावले आहेत.

खोके सरकार बिल्डरांची हांजीहांजी करणं सोडून जनतेची सेवा कधी करणार?, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका


जरांगेंचे न्यायालयावरही आरोप

माझ्या आंदोलनाबाबत न्यायालयात १३ मार्चला तारीख पडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्तेच्या याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यास लावले आहे. मराठा आंदोलकला १३ मार्चची तारीख असताना 23 फेब्रुवारी सुनावणी घेण्यात आली. एका रात्रीत कोर्ट बदलले. कोपर्डीच्या बहिणीचा निकाल एका रात्रीत का दिला जात नाही, असेही जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना आया-बहिणी दिसत नाही का, असे जरांगे म्हणाले.

फडणवीसांवर बोलताना जरांगेंची जीभ घसरली

24 फेब्रुवीराला शांतेत आंदोलन केल्यानंतरही आमच्या काही तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे मीच मुंबईला फडणवीसांच्या बंगल्यावर गोळ्या झेलायला चाललो आहे. खास मराठा आहे मी तुझ्या समोर येतो. तू पण समोर ये. बुकीत तुझे दात पाडतो. पोलिसांनी वापर करून बाकीचे कुटाणे मला शिकू नको. गृहमंत्री हराम…आहे. तेरा टक्के आरक्षण दिल्यानंतर राज्यात जल्लोष झाला होता. आता आरक्षण देऊनही जल्लोष होत नसल्याने तो गृहमंत्री चिडला आहे. त्यामुळे माझा काटा काढण्यासाठी माझी बदनामी केली जात आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज