खोके सरकार बिल्डरांची हांजीहांजी करणं सोडून जनतेची सेवा कधी करणार?, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

  • Written By: Published:
खोके सरकार बिल्डरांची हांजीहांजी करणं सोडून जनतेची सेवा कधी करणार?, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

Aditya Thackeray : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे (Gokhale Bridge) काम सुरू झाल्यापासून अंधेरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळत होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी गोखले पुलाचे काम पूर्ण झाले. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटरवरून गोखले पुलाच्या उद्घाटनावरून शिंदे सरकार आणि महापालिका आयुक्तांवर टीका केली होती. त्यानंतर उद्या या गोखले पुलाचे उद्घाटन होणार आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी एक पोस्ट करत सरकारवर टीका केली

Kumar Sahani Passed Away : मायादर्पण आणि कस्बाचे दिग्दर्शक कुमार साहनींच निधन चित्रपटसृष्टीवर शोककळा 

खोके सरकारचे व्हिआयपी बिल्डर आणि कंत्राटदारांची हांजीहांजी सोडून, जनतेची सेवा करण्यावर कधी भर देणार? असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

आदित्य ठाकरेंनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की, उशिरा होत असलेल्या आणि अर्धवट तयार झालेल्या गोखले पुलाच्या उद्घाटनाचा मुद्दा आम्ही उपस्थित केल्यानंतर आता उद्या सायंकाळी साडेपाच वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं समजतंय. आमचा दबाव कामी आला, ह्याचा आनंद आहेत. पण प्रश्न असा आहे की, ५ दिवसांपूर्वीट काम झालेलं असतानाही मुंबईकरांनी उद्यापर्यंत तरी का थांबावं? तसेच… जे आमदार खोटं बोलले की, ‘मॅस्टिक वर्क’ बाकी आहे आणि महानगरपालिका आयुक्त खोटं बोलत होते की, लोड टेस्टिंग बाकी आहे, त्याचं काय झालं? मी केलेल्या ट्विटनंतर 12 तासांच्या आतच सगळं काम पूर्ण झालं?,असं आदित्य म्हणाले.

मनोज जरांगेंना कुणाची चावी? जरांगेंच्या आरोपानंतर सदावर्तेंनी थेट नावचं घेतलं 

या ट्विटमधून आदित्या ठाकरेंनी यांनी राज्य सरकारने थांबवून ठेवलेल्या काही उद्घाटनांवरून सरकारला फटकारले आहे. देशांतर्गत विमानतळजवळच्या पुलाचं उद्घाटन कधी होणार? त्याचप्रमाणे पुण्यात, रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो तयार आहे आणि एक महिन्यापासून उद्घाटनाच्या तारखेची वाट पाहते आहे. विमानतळाचे टर्मिनल 2 गेल्या 6 महिन्यांपासून उ्दघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. खोके सरकार व्हिआयपी बिल्डरांची आणि कंत्राटदारांची हांजीहांजी सोडून, जनतेची सेवा करण्यावर कधी भर देणार? असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube