PM Modi US Visit : अमेरिकन व्यावसायिकांमध्येही पंतप्रधान मोदींची क्रेज; दौऱ्याआधीच सुरु केली ‘मोदी थाळी’

PM Modi US Visit : अमेरिकन व्यावसायिकांमध्येही पंतप्रधान मोदींची क्रेज; दौऱ्याआधीच सुरु केली ‘मोदी थाळी’

PM Modi US Visit : अमेरिकन व्यवसायिकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रेज वाढू लागली आहे.पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील न्यूजर्सी रेस्टॉरंटमध्ये ‘मोदी जी थाळी’ तयार करण्यात आलीय. येत्या 22 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी श्रीपाद कुलकर्णी यांनी ही खास थाळी बनवली आहे.

आम्ही लवकरच मोदीजी थाळी सुरु करणार असून मोदींच्या नावाने सुरु केलेली थाळी लोकप्रिय ठरणार असल्याचा विश्वास रेस्टॉरंटच्या मालकांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी थाळीनंतर ‘डॉ. जयशंकर थाळी’ सुरु करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

French Open 2023 Final: नोव्हाक जोकोविच आणि कॅस्पर रुड यांच्यात होणार विजेतेपदाची लढत

पंतप्रधान मोदीज थाळीमध्ये खिचडी, रसगुल्ला, सरसो, कोथंबीर वडी, ढोकला, पापड, दम आलू कश्मीरी, या खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे. थाळीचा आस्वाद घेतल्यानंतर नागरिकांनी मोदीजी थाळी ही लोकांना आवडणार असून लोकप्रिय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

BJP: देवेंद्र फडणवीसांच्या ‘मिशन 45’ वर अमित शाहांचा शिक्कामोर्तब, शिंदे गटाचे काय ?

एखाद्या रेस्टॉरंटने पंतप्रधान मोदींच्या नावाने थाळी करण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधी 17 सप्टेंबर २०२२ रोजी मोदींच्य वाढदिवसानिमित्त दिल्लीत ही थाळी सुरु केली होती. दिल्लीतल्या एका रेस्टॉरंटने ’56 इंची नरेंद्र मोदी थाळी’ सुरु केली होती.

दरम्यान, येत्या 22 जून रोजी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह त्यांच्या पत्नी मोदींसोबत भोजन करणार आहेत. अमेरिकन कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीनंतर संबोधित करणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube