BJP: देवेंद्र फडणवीसांच्या ‘मिशन 45’ वर अमित शाहांचा शिक्कामोर्तब, शिंदे गटाचे काय ?
BJP mission loksabha election : लोकसभा, विधानसभा निवडणुकीची भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व लोकसभा, विधानसभा जागांसाठी निवडणूक प्रमुख नेमलेले आहेत. तर गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राज्यातून भाजपचे 45 खासदार निवडून देण्याचे मिशन आहे. त्यावर नांदेड येथील सभेत अमित शाह यांनी शिक्कामोर्तब केला आहे. (devendra-fadanvis-amit-shah-bjp-mission-45-seat)
अमित शाह यांनी आपल्या भाषणात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे ठाकरे यांनी मान्य केले होते. पण एेनवेळी ठाकरे यांनी दगाफटका केल्याचा आरोपही शाही यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याचा निर्धार करू या, अशी घोषणाच अमित शाह यांनी केली आहे. अमित शाह यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
‘राहुल गांधी दहशतवादी लादेनसारखी दाढी ठेवतात….’,भाजप नेत्याच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड
तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. फडणवीस म्हणाले, भाजप-सेनेला पराभूत करण्यासाठी तिघे एकत्र आल्याचे ते सांगत आहेत. पण जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्र आले तरी वाघांचे शिकार करू शकत नाही हे त्रिकालबाधीत सत्य आहे.
Muslim Reservation: ‘मुस्लिम आरक्षण संपवणे हे आमचे लक्ष्य’: अमित शाहंचे मोठे विधान
शिंदे गट व भाजपमध्ये लोकसभा जागा वाटपाबाबत निर्णय झालेला नाही. त्यात लोकसभेच्या सर्व जागांवर भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. भाजपच्या या मिशनमुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता असल्याची राजकीय चर्चा आहे. त्यात दोन दिवसांपूर्वी भाजप नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामधील वाद उफाळून आला होता. शिंदे यांनी थेट खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. तर आता भाजपच्या मिशन 45 जागांवरही अमित शाह यांनी शिक्कामोर्तब केला आहे.