‘राहुल गांधी दहशतवादी लादेनसारखी दाढी ठेवतात….’,भाजप नेत्याच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड
Samrat Chaudhary criticized Rahul Gandhi : भाजपकडून (BJP) कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सातत्याने टीका होते. कधी त्यांच्या लुकवरून तर कधी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप नेते राहुल गांधींचा समाचार घेत असतात. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान दाढी वाढवली होती. त्यांच्या या लूकवरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. काही दिवसांपूर्वीच आसामचे मुख्यमंत्र्यांनी गांधी यांना सद्दाम हुसेन असं संबोधलं होतं. तर आता बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) यांनीही राहुल गांधींची तुलना ओसामा बिन लादेनशी (Osama Bin Laden) केली. यावरून देशात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. (Bihar BJP President Samrat Chaudhary said- Rahul Gandhi has a beard like Osama Bin Laden.)
भाजपने आता पुढील निवडणुकांसाठी सीमांचलकडे लक्ष दिले आहे. त्यासाठी भाजप नेते दररोज या ठिकाणी भेट देत आहेत. काल बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी हे देखील दोन दिवसीय सीमांचल दौऱ्यावर आले. त्यावेळी एका सभेला संबोधित करतांना चौधरी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. चौधरी यांनी लव्ह जिहाद आणि घुसखोरीभाष्य केलं. तर नितीश कुमार आणि राहुल गांधींवरही निशाणा साधला. चौधरी यांनी राहुल गांधींची तुलना अल-कायदाचा मारला गेलेला प्रमुख ओसामा बिन लादेनशी केली.
जिंतूर परभणी रोडवर दारूचा ट्रक पलटी, जखमीला मदत करण्याचं सोडून लोकांनी पळवले दारूचे बॉक्स
ते म्हणाले, केवळ दाढी वाढवून कोणीही देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही. आजकाल राहुल गांधी हे दहशतवादी ओसामा बिन लादेनसारखी दाढी ठेवत आहेत. दाढी वाढवून मोदीजींप्रमाणे त्यांना देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे. मात्र, नुसती दाढी वाढवून पंतप्रधान होता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला
नितीश कुमार बिहारच्या आरोग्यासाठी हानिकारक : सम्राट चौधरी
यावेळी सम्राट यांनी नितीश कुमार यांच्यावरही हल्लाबोल केला. नितीश कुमार यांची मानसिक स्थिती ठीक नाही, बिहारच्या आरोग्यासाठी ते हानिकारक आहेत. त्यांना पंतप्रधानपदाच्या मुकुटाचे दिवास्वप्न पाहत आहेत, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, नितीश कुमार देशभर फिरत आहेत. सर्वांना सांगत आहेत की, ते देशाचे पंतप्रधान आहेत. नितीश कुमार पंतप्रधान आहेत का? त्यांची मानसिक बरी नाही. गजनी आमीर खानच्या गजनी सिनेमातील नायकासारखी त्यांची अवस्था आहे, असं सम्राट म्हणाले.
सरकार आल्यास लव्ह जिहादच्या प्रकरणांची चौकशी होईल : चौधरी
बिहारमध्ये भाजपचे सरकार आल्यास ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे बिहार भाजप अध्यक्ष म्हणाले. गोहत्या थांबवणे हा भाजपचा पहिला धर्म आहे. भाजप सरकार कोणालाही गोंधळ घालू देणार नाही.
सम्राट चौधरी यांच्या वक्तव्याचा आरजेडीने घेतला समाचार
सम्राट चौधरी यांनी राहुल गांधी यांची दहशतवादाशी तुलना केल्याने आरजेडीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार मनोज झा म्हणाले की, ‘या देशात करोडो लोक दाढी ठेवतात. अनेक संत-महात्मे दाढी ठेवतात. ते सर्व ओसामा बिन लादेन आहेत का?’ असा सवाल त्यांनी केला.