जिंतूर-परभणी रोडवर दारु ट्रकचा अपघात; जखमीला मदत करण्याचं सोडून बाटल्यांसाठी धावपळ

जिंतूर-परभणी रोडवर दारु ट्रकचा अपघात; जखमीला मदत करण्याचं सोडून बाटल्यांसाठी धावपळ

Liquor transport truck Accident : माणुसकी जपत मदतीचा हात पुढे करत असतात. पण, दारूची बाटली दिसली की माणुसकी हरपली असाच काहीसा प्रकार काल घडला. दारूची वाहतूक करणारा ट्रक पलटी (Truck accident) झाल्यानंतर जखमी चालकास मदत करण्याचं सोडून नागरिक दारूच्या बाटल्या उचलण्यात व्यस्त होते. जिंतूर परभणी रोडवरील (Jintoor Parbhani Road) येसेगाव पाटील जवळ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेला दारूची वाहतूक करणारा ट्रक (Liquor transport truck) रस्त्यावर उलटला. या अपघातात ट्रकचा चालक थोडक्यात बचावला. मात्र, तो जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी नागरिकांनी अपघातातील जखमी चालकाला मदत करण्याऐवजी दारूच्या बॉटलवर डल्ला मारण्यात धन्यता मानली. (Liquor truck overturned on Jintur Parbhani Road, citizens snatched boxes of liquor from the accident truck)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून जिंतूर-परभणीमार्गे नांदेडकडे दारू घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगाने जात होता, जिंतूर परभणी रस्त्यावर येसेगाव पाटीजवळ अज्ञात कंटेनरने जोरदार कट मारल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळं ट्रक रस्त्याच्या खाली पडला. चालकाने कसातरी ट्रकवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक रस्त्याच्या कडेला मुरूम टाकलेल्या जागेवरून घसरला आणि बाजूला शेतात पलटी झाला.

अजितदादांच्या नाराजीवर राणेंचे थेट उत्तर, ‘पक्ष शरद पवारांचा…’

यावेळी ट्रकमधून दारूच्या बाटल्यांनी भरलेले बॉक्स बाहेर पडले होते. या घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी अवस्थेत असताना त्याला मदत करण्याऐवजी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांसह दुचाकी चालकांनी दारूचे बॉक्स पळवले. अनेकांनी मिळेल त्या पध्दतीने दारू नेण्याचा प्रयत्न केला. दारूच्या बाटल्या घेण्यासाठी अनेकांची झुंबड उडाली होती. अगदी काहीच वेळात गावातील मंडळींनी ट्रकमधील बराच माल लंपास केला. जखमी चालकाने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून पेटी घेऊन जाणाऱ्या नागरिकांना थांबवले.

दरम्यान, ट्रकचालक इर्शाद खान फिरोज खान (वय 37, रा. वैजापूर) याला जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताच्या घटनेसंदर्भात जिंतूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर अनेक बॉक्समधील बाटल्या फुटून लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube