अजितदादांच्या नाराजीवर राणेंचे थेट उत्तर, ‘पक्ष शरद पवारांचा…’

अजितदादांच्या नाराजीवर राणेंचे थेट उत्तर, ‘पक्ष शरद पवारांचा…’

Narayan Rane on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. मात्र या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावं नसल्याने राजकीय चर्चांना उधान आले होते. कार्यकारी अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेनंतर बैठक संपताच अजित पवार तातडीने उठून निघून गेले होते. यामुळे अजित पवार यांच्यावर अन्याय झाला आहे का? अशी देखील चर्चा रंगली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे. (Narayan Rane’s direct reply to Ajit Pawar’s displeasure)

राष्ट्रावादीत अजित पवार यांच्यावर अन्याय झाला आहे का? असा सवाल नारायण राणे यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आपल्या मुलांची नाव वडील ठेवणार नाही कोण ठेवणार? अजित पवार यांच्यावर अन्याय झाला असा मला वाटतं नाही. शरद पवार यांचा पक्ष आहे. कोणाला कुठली पद द्यावे ते ठरवतील त्यांच्याकडे अनुभव माझ्यापेक्षाही जास्त आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांचे स्पष्टीकरण
अजित पवार नाराज आहेत वगैरे यात एका पैशाची पण सत्यता नाही. जयंत पाटील सध्या राज्यात प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे एक जबाबदारी आहे. अजित पवार हे महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडेही एक जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे विशेष अशी जबाबदारी नव्हती. ते जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी उपलब्ध होते. त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे कोणी नाराज आहे या गोष्टीत काहीही तथ्य नाही. मागच्या एका महिन्यापासून सर्वच वरिष्ठ नेत्यांनी या दोघांची नावं आमच्यापुढे ठेवली होती. त्याचा निर्णय आज झाला.

अजितदादा, जयंत पाटलांना बाजूला ठेवत पवारांनी उभारली नवी टीम; कोणाकडे कोणती जबाबदारी?

अजित पवार म्हणाले ‘सुप्रियाचं नाव मी सुचविलं’
सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करावी असं मी सुचविलं होतं. मला असं वाटतं की नवीन नेतृत्व पुढे आलं आहे. प्रफुल्ल पटेल अनेक वर्ष केंद्राच्या राजकारणात आहेत. सुप्रिया अनेक वर्ष बारामतीचे लोकसभेत प्रतिनिधित्व करते. उत्तम संसदपटू म्हणून नावाजलेलं आहे. ती जास्तीत जास्त दिल्लीतच असते.

शरद पवार प्रत्येक निवडणुकीत उघडे पडतात, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

काही माध्यमांमध्ये अशाही बातम्या चालल्या की अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. पण माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी आहे आणि मी ती पार पाडत आहे. त्यामुळे अशा चर्चा थांबवा, असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube