शरद पवार प्रत्येक निवडणुकीत उघडे पडतात, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

शरद पवार प्रत्येक निवडणुकीत उघडे पडतात, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis on Sharad Pawar : निवडणुका जवळ आल्या की पवारसाहेबांचे स्टेटमेंट सुरु होतात. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीपूर्वी बोलले की मोदींची लाट नाही. पण पवारसाहेब असं बोलतात आणि उघडे पडतात. मोदीच पुन्हा निवडून येतात. 2019 पूर्वी पवारसाहेबांनी सांगितले मोदींची लाट नाही. त्यावेळी सर्व विरोधक एकत्र येऊन हातात हात घेऊन उभा राहिले. जेवढे नेते हातात हात घालून उभा होते, तेवढ्या जागा देशात देखील राष्ट्रवादीच्या आल्या नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.

आता निवडणुका आल्या तर शरद पवारांचे स्टेटमेंट आले की देशातील हवा बदलती आहे. काही हवा बदलत नाही. हा देश कालही मोदींच्या मागे होता. आजही मोदींच्या मागे आहे. उद्याही मोदींच्या मागे राहील, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अजितदादांकडे आमदारांचा वेगळा संच; सामंतांचे सूचक वक्तव्य

अमित शहा यांची नांदेडला सभा ठेवली तर अशोक चव्हाण म्हणाले की त्यांना निवडून येण्याची खात्री नाही म्हणून सभा घेत आहेत. पण असं नाहीय. गेल्या नऊ वर्षात केलेले काम आमच्याकडे सांगण्यासारखे आहे म्हणून आम्ही सभा घेतोय. अशोकराव तुमची मजल टू जी, थ्री जी आणि सोनियाजी याच्यापलिकडे गेली नाही. तुमचाकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे तुम्ही सभा घेण्याची हिम्मत करत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना सुनावले.

NCP : पवारांचा सेफ गेम! चव्हाणांना पाठिंबा देत अजितदादांच्या खांद्यावर ठेवली बंदूक

ते पुढं म्हणाले की काँग्रेस पक्षाला अधूनमधून विजय मिळतो. तो विजय त्यांच्या डोक्यात जातो. आता कोणताही काँग्रेसचा नेता म्हणतो की आम्ही महाराष्ट्रात कर्नाटकचा पॅटर्न आणू. कालपर्यंत यांना कर्नाटक म्हटले की राग यायचा. पण यांना मला सांगायचं आहे की महाराष्ट्रात फक्त एकच पॅटर्न चालतो तो म्हणजे छत्रपती पॅटर्न. इंथ कोणताच पॅटर्न चालू शकत नाही. इथ एकच पॅटर्न आहे छत्रपती शिवरायांचा पॅटर्न आणि तो पॅटर्न या देशात फक्त नरेंद्र मोदींनी आणलाय. त्यामुळे इथ फक्त मोदी पॅटर्न चालणार आणि मोदी पॅटर्नने 2014 मध्ये विजय मिळवून दिलाय. 2019 मध्येही विजय दिला आणि 2024 मधील महाविजयाची तयारी आपण याठिकाणी सुरु केली आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube