भारताचा ‘पॅंथर’, प्रत्येक युद्धात कमाल…मिग-21 सप्टेंबरमध्ये होतेय निवृत्त

भारताचा ‘पॅंथर’, प्रत्येक युद्धात कमाल…मिग-21 सप्टेंबरमध्ये होतेय निवृत्त

Mig 21 fighter jet to bow out after 62 years in indian air force : 60 आणि 70 च्या दशकात भारताच्या अवकाशावर अधिराज्य गाजवणारे मिग-21 हे लढाऊ विमान सप्टेंबरमध्ये निवृत्त होत आहे. ‘पँथर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या 23 व्या स्क्वॉड्रनने भारताच्या प्रत्येक लहान-मोठ्या युद्धात भाग घेतला आहे. 60 वर्षांहून अधिक काळ भारतीय हवाई दलाचा भाग राहिल्यानंतर, आता 19 सप्टेंबर रोजी चंदीगड एअरबेसवर एका समारंभात भारताच्या पॅंथरला निरोप देण्यात येईल. 1963 मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाल्यानंतर मिग-21 चा एकूण प्रवास कसा होता ते जाणून घेऊया…

पत्त्याची जाहिरात स्किप करायला 42 सेकंद? रोहित पवारांचा कोकाटेंवर दुसरा बॉम्ब!

मिग-21 लढाऊ विमानाचा इतिहास मिश्र स्वरूपाचा आहे. हे लढाऊ विमान भारताने सोव्हिएत युनियनकडून खरेदी केले होते. त्यानंतर, 1963 मध्ये ते भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. भारतीय हवाई दलात सामील झाल्यानंतर, त्यांची अनेक विमाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने भारतातच बनवली.

मोठा निर्णय! CBSE शाळांत आता CCTV कॅमेऱ्यांचा वॉच; 15 दिवसांचे रेकॉर्डिंग बंधनकारक

1960 आणि 70 च्या दशकात आकाशात मिग-21 स्क्वॉड्रनच्या उपस्थितीमुळे भारतीय हवाई दलाला त्यावेळी एक धोरणात्मक फायदा मिळाला. 1965 च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धात, 1971 मध्ये बांगलादेशच्या मुक्ततेत, 1999 मध्ये कारगिल युद्धात आणि 2019 मध्ये बालाकोट हल्ल्यात मिग-21 ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्येही मिग-21 स्क्वॉड्रन अलर्ट मोडवर होता.

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात; 24 जुलैला सुनावणी

अपघातांनंतर ‘उडती शवपेटी’ हे नाव

एकीकडे मिग-21 ने 60-70 च्या दशकात आकाशात आपल्या उपस्थितीने भारतीय हवाई दलाला बळकटी दिली, तर दुसरीकडे कालांतराने त्याचे तंत्रज्ञान कमकुवत होऊ लागले. अनेक अपघातांमुळे त्याला ‘उडत्या शवपेटी’ हे नावही देण्यात आले. सध्याच्या काळात मिग-21 हे अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या विमानांसमोर काही खास राहिले नाही. परंतू 60-70 च्या दशकात ते सर्वोत्तम लढाऊ विमानांमध्ये गणले जात असे. त्याच्या जुन्या तंत्रज्ञानामुळे आणि अपघातांनंतर उद्भवणाऱ्या प्रश्नांमुळे ते आता 62 वर्षांनी, 19 सप्टेंबर रोजी निवृत्त होईल. पँथर्स स्क्वॉड्रन निघून गेल्यानंतर, भारतीय हवाई दलातील फायटर स्क्वॉड्रनची संख्या 29 पर्यंत कमी होईल. जी 1965 नंतरची सर्वांत कमी संख्या आहे. 1965 मध्येही 32 फायटर स्क्वॉड्रन होते.

‘मला दोष मुक्त करा’, वाल्मिक कराडचा अर्ज; पण न्यायालयाने… उज्वल निकमांनी काय सांगितलं?

प्रत्येक युद्धात कमाल

विमान वाहतूक तज्ज्ञ अंगद सिंह म्हणाले, “इतर कोणतेही लढाऊ विमान इतक्या काळापासून भारतीय हवाई दलाशी जोडले गेले नाही. हे विमान हवाई दलाच्या 93 वर्षांच्या इतिहासाच्या दोन तृतीयांश काळापासून आहे. 1965 पासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत प्रत्येक आघाडीवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आजच्या प्रत्येक भारतीय लढाऊ वैमानिकाच्या कारकिर्दीत या घटनेचे योगदान आहे. भारतीय आकाशातील एका महान विमानाला हा भावनिक निरोप असेल यात शंका नाही”.

स्वदेशी विमानांच्या पुरवठ्यात विलंब

जगभरात या विमानांचा वापर आता संपला आहे, परंतु हवाई दल मात्र त्यांची अंतिम मुदत वाढवत आहे. कारण त्यांची जागा घेण्यासाठी आधुनिक लढाऊ विमाने अद्याप सापडलेली नाहीत. यापूर्वी मिग-21 स्क्वॉड्रनची जागा हलक्या लढाऊ विमानांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु या स्वदेशी विमानांच्या वितरणास विलंब झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube