जामखेडच्या कलाकेंद्रातील नर्तकी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक.

जामखेडमधील कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या दीपाली पाटील या महिलेची खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या.

  • Written By: Published:
WhatsApp Image 2025 12 05 At 9.49.45 PM

dancer committed suicide by hanging herself. : जामखेडमधील कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या दीपाली पाटील या महिलेने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जामखेड (Jamkhed) शहरात खळबळ उडाली आहे. मृत दीपाली पाटील (Dipali Patil) ही मूळची कल्याणमधील रहिवासी आहे. तिच्या काही मैत्रिणींसोबत ती जामखेडमधील तपेश्वर भागात राहत होती. आज सकाळच्या सुमारास बाजारात जाऊन येते सांगून ती घराबाहेर पडली. बराच वेळ उलटूनही ती परत न आल्यानं मैत्रिणींनी तिचा शोध घ्यायला सुरूवात केली. ती ज्या रिक्षाने गेली होती, त्या रिक्षाच्या चालकाकडे चौकशी केली असता, तिला त्याने साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे तिच्या मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या असता तिची रूम आतून लॉक होती. संबंधित लॉजच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता दिपालीने गळफास घेतला असल्याचं आढळलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तात्काळ शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या घटनेच्या बाबतीत ट्विट करून प्रश्न उपस्थित केले.

 

या प्रकरणी दिपालीची मैत्रिण हर्षदा कामठे हिने दिलेल्या माहितीवरुन जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दिपाली पाटील आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत कोण होते? त्या व्यक्तीचे संबंध कोणाशी आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा पाठिंबा आहे? त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याचे तपशील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन शोधावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान दीपाली पाटील हिला संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्यानेच तिने आत्महत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे. संदीप गायकवाड हा भाजपशी निगडीत असल्याची माहिती असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस तपासात सत्य समोर येणार आहे.

follow us