पत्त्याची जाहिरात स्किप करायला 42 सेकंद? रोहित पवारांचा कोकाटेंवर दुसरा बॉम्ब!

Rohit Pawar Again Allegations On Manikrao Kokate : अधिवेशनात ‘रमी’ खेळल्याचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर होत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सभागृहाचं कामकाज सुरू असताना, गंभीर विषयावर चर्चा सुरु होते. परंतु मंत्री महोदय रमी खेळत होते, असा ठपका ठेवत रोहित पवारांनी कोकाटेंनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. याला उत्तर देताना, माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मी चौकशीसाठी स्वतः मागणी (Agriculture Minister Manikrao Kokate) केलेली आहे. चौकशीमध्ये जर मी दोषी आढळलो, तर नक्कीच राजीनामा देईन. पण यावर राजकारण करून अनावश्यक गदारोळ निर्माण केला जातोय.
मोठा निर्णय! CBSE शाळांत आता CCTV कॅमेऱ्यांचा वॉच; 15 दिवसांचे रेकॉर्डिंग बंधनकारक
रोहित पवारांचा दुसरा बॉम्ब
रोहित पवारांनी कोकाटेंवर टीका करत म्हटलं की, कृषिमंत्रीचं विधान की ‘सभागृहाचं कामकाज संपलं होतं’, हे सरळसरळ खोटं आहे. आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. त्यांना यामध्ये रसच नव्हता. पत्त्याची जाहिरात ‘स्किप’ करायला तब्बल 42 सेकंद लागतात? असं देखील रोहित पवारांनी म्हटलंय. कोकाटे साहेब आज राजीनामा देतील असं वाटलं होतं, पण त्यांनी उलट कोर्टात जाण्याची भाषा करत ‘गिरे तो भी टांग ऊपर’ भूमिका घेतली. मंत्रीपदाचं संरक्षण करण्यासाठी जेवढा खटाटोप करत आहेत, तेवढा शेतकऱ्यांसाठी केला असता तर ही वेळच आली नसती, असंही रोहित पवार म्हणाले. त्यांनी X अकाउंटवर अशी पोस्ट केली आहे.
सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत… pic.twitter.com/KQJE4eHtwz
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 22, 2025
कोकाटेंची भूमिका काय?
रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना माणिकराव कोकाटे म्हणाले, या आरोपांबाबत मी आधीच चौकशीसाठी मागणी केली आहे. चौकशी झाली आणि त्यात मी दोषी आढळलो, तर मी राजीनामा देईन. पण एका विषयावर पुन्हा पुन्हा बोलणं आणि गोंधळ उडवणं म्हणजे केवळ जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. मी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिलेली आहेत. आता सत्य काय आहे ते चौकशीमधून स्पष्ट होईल. मला व्हिडिओ स्किप करायला वेळ लागतो. मी कमी हुशार असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम येतात. रोहित पवार माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत. त्यामुळे त्यांना कमी प्रॉब्लेम येतात, असा देखील टोला कोकाटे यांनी लगावला आहे.
War 2 : ऋतिक-एनटीआरचा अॅक्शन ब्लास्ट! 25 वर्षांचा स्टारडम, ट्रेलर 25 जुलै रोजी धडकणार
राजीनामा पुढील अधिवेशनात का द्यायचा?
या संपूर्ण प्रकरणात रोहित पवारांनी सांगितलं की, मी हे व्हिडिओ आधी शेअर केले नाहीत, कारण विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये, अशी माझी भूमिका होती. पण मंत्री महोदय कोर्टात जाण्याची भाषा करत असल्याने सत्य जनतेच्या न्यायालयात आणणं भाग होतं. जेव्हा सत्य झाकलं जात नाही, तेव्हा कोकाटे साहेबांनी राजीनामा पुढील अधिवेशनात का द्यायचा? तोपर्यंत शेतकऱ्यांना का सहन करायला लावायचं? असा थेट सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.