रेल्वे तिकीट मिळणार ईएमआयवर! रेल्वे विभागाचा मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Railway Departments New Decision : रेल्वे विभाग (Railway Departments) प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा, म्हणून नेहमीच नवनवीन धोरणे राबवत असते. प्रवाशांच्या हिताचे निर्णय ते नेहमीच घेत असतात. त्याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर फायदाही होत असतो. याच धोरणांतर्गत रेल्वेने तिकीट रिझर्व्हेशन, वेटिंग तिकीट, रिझर्व्हेशन चार्ज, तत्काळ तिकीटच्या बुकिंगमध्ये अनेक बदल केले आहेत. आता रेल्वे विभागाने (Railway Ticket) आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. विभागाने एक स्पेशल टूर पॅकेज (Railway Ticket On EMI) आणले आहे. ज्यामध्ये हे पॅकेज घेतल्यानंतर प्रवाशांना तिकीटाचे पैसे हप्त्याने चुकवता येणार आहेत. प्रवाशांना ईएमआयद्वारे ही रक्कम भरता येईल.
सातासमुद्रापार अमृताच्या नृत्याविष्काराचा डंका! सुंदरी ऑन ग्लोबल स्टेज…
स्पेशल टूर पॅकेज
आयआरसीटीसी (IRCTC) रेल्वेचे तिकीट तर बुक करतेच, पण त्यासोबतच देश-विदेशासाठी विविध टूर पॅकेजेस पण देते. रेल्वेकडून देशातील प्रसिद्ध तिर्थस्थळांसाठी वेगवेगळे स्पेशल टूर पॅकेज देण्यात येते. ‘भारत गौरव यात्रा’ या नावाने हे पॅकेज असते. या योजनेतंर्गत तुम्ही ट्रेनचे टूर पॅकेज सहज बुक करू शकता. प्रवास झाल्यानंतर हप्त्याने तिकीटाचे पैसे चुकते करू शकता. यामुळे ज्या प्रवाशांना प्रवासाचे एकत्रित पैसे भरता येत नाहीत, त्यांना ईएमआयद्वारे आपल्या तीर्थक्षेत्रांच्या भेटीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
… तर राजीनामा देतो, रमीच्या व्हिडीओनंतर कृषीमंत्री कोकाटेंनी विरोधकांना घेतलं फैलावर
ईएमआय फक्त ‘याच’ रेल्वेगाड्यांसाठी
ही ऑफर आयआरसीटीसी फक्त ‘भारत गौरव ट्रेनसाठीच’ देते. या ट्रेनचे तिकीट बुकींग करताना प्रवाशांना ईएमआयचा पर्याय मिळतो. समजा तुम्ही 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंतच्या भारत गौरव ट्रेनचे तिकीट बुक केले तर या ट्रेनच्या इकोनॉमी क्लासचे भाडे हे 18,460 रुपये प्रति व्यक्ती आहे. त्यामध्ये स्लीपर क्लासचे ट्रेन तिकीट, हॉटेलमध्ये थांबण्याचा खर्चाचा देखील समावेश आहे. तर थर्ड एसी कोचचे भाडे 30,480 रुपये प्रति व्यक्ती आहे. तर कम्फर्ट श्रेणीचे भाडे 40,300 रुपये आहे. कुटुंबासोबत प्रवास करायची तिकीटीची रक्कम अधिक आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांसाठी ईएमआयची सुविधा दिली आहे.
ईएमआयचा पर्याय
भारत गौरव ट्रेनेचे भाडे देण्यासाठी प्रवाशांना एलटीसी (LTC) आणि ईएमआय (EMI) ची सुविधा मिळते. त्यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) ने अनेक सरकारी आणि खासगी बँकांशी करार केला आहे. या संकेतस्थळावरून तिकीट बुकिंग करताना प्रवासी ईएमआयचा पर्याय निवडू शकतील. हे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर देण्यात येणार आहे.