… तर राजीनामा देतो, रमीच्या व्हिडीओनंतर कृषीमंत्री कोकाटेंनी विरोधकांना घेतलं फैलावर

… तर राजीनामा देतो, रमीच्या व्हिडीओनंतर कृषीमंत्री कोकाटेंनी विरोधकांना घेतलं फैलावर

Agriculture Minister Manikrao Kokate Press Conferance after Playing Rummy game in Legislature : पावसाळी अधिवेशनाचं सत्र गाजत असतानाच, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका व्हिडिओमध्ये ते विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर ‘रमी’ हा कार्ड गेम खेळताना (Viral Rummy Clip) दिसत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याच्या चर्चा असताना त्यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे.

अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला धक्का; शहरप्रमुख काळेंवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, पोलिसांनी केली अटक

तसेच यावेळी कोकाटे यांनी आपल्यावर रमी गेम खेळण्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी सुनावलं आहे. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना जाहिर करत आहोत. यातून 5 हजार कोटी भांडवली गुंतवणुक करण्यात येणार आहे. त्याचा जीआर आज काढण्यात आला आहे. यामध्ये नैसर्गिक शेतीला अनुदान देणार आहे. असं यावेळी कोकाटे म्हणाले आहेत.

नाशिकनंतर पुण्यातही खळबळ! गिरीश महाजनांचे विश्वासू प्रफुल लोढा अडचणीत; आणखी एक अत्याचाराचा गुन्हा

तसेच माझ्या रमी खेळतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर मी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच रमी खेळताना त्यासाठी मोबईल नंबर आणि बॅंक अकाऊंट जोडावे लागते. त्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही. तसेच मी रमी खेळत नाही. त्यामुळे माझा नंबर आणि बॅंक अकाऊंट नंबर जोडलेला नाही. मला रमी खेळताच येत नाही. तसेच माझा मोबाईल नंबर आणि बॅंक अकाऊंट नंबर देतो. कुठेही चेक करा तुम्हाला सापडणार नाही.

धनखड यांचा राजीनामा, राज्यसभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे आता कोणाकडे? नवा उपराष्ट्रपती कसे निवडणार?

तसेच यावेळी त्यांनी विरोधकांना यावेळी फैलावर घेतले. ते म्हणाले की, या व्हिडीओमुळे माझी बदनामी झाली आहे. त्यामुळे ज्यांनी माझी ही बदनामी केली त्या राजकीय नेत्यांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. व्हिडीओ पूर्ण दाखवला जावा. त्यात मी व्हिडीओ स्किप करत असल्याचं दिसेल. याबाबतमी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देईल. जर मी दोषी आढळलोतर आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढच्या अधिवेशनात निवेदन दिलं तरी मी त्या क्षणी राजीनामा देईल. तसेच यावेळी त्यांच्या मागच्या वादग्रस्त विधानांविषयीदेखील पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube