बांग्लादेशमध्ये गुजरात अपघाताची पुनरावृत्ती; कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं फायटर प्लेन, 19 मृत्यू

Bangladesh Air Force Jet Crash : बांगलादेशमध्ये (Bangladesh) विमान दुर्घटना (Air Force Jet Crash) घडली आहे. हवाई दलाचे F-7 प्रशिक्षण विमान 21 जुलैला ढाक्यातील उत्तरा परिसरातील माइलस्टोन कॉलेजच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये असलेल्या शाळेच्या इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेत किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनी बनावटीचे हे विमान आहे. अपघाताची तीव्रता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Mulatoon Manoos Award : प्रेम करता येणं हेच माणूसपणाचं लक्षण : सचिन परब
VIDEO | Dhaka: Bangladesh Air Force training jet crashes into a school in Dhaka, killing at least one person, fire official says. More details awaited.
(Source: PTI Videos) pic.twitter.com/bzXMGqJTEE
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2025
F-7 BGI हे विमान ढाकाच्या उतारा भागातील माइलस्टोन स्कूल आणि कॉलेजच्या परिसरात दुपारी कोसळले आहे. आज दुपारी 1.30 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 1.00 वाजता) ही दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा शाळेत विद्यार्थी उपस्थित होते. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये माइलस्टोन कॉलेजच्या कॅम्पसमधून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
तसेच अनेक शालेय विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत.
पंप अँड डंप : शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी कमावून देणारा घोटाळा; कशी होते सामान्यांची फसवणूक?
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हवाई दलाचे FT-7BGI हे एक प्रशिक्षण विमान आहे.
या विमानाने दुपारी १:०६ वाजता उड्डाण केले आणि 24 मिनिटांनी दुपारी 1.30 वाजता ते कोसळले. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली. मात्र, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आग लागली, त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
16 जणांचा मृत्यू, 70 जण जखमी
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच बांगलादेश लष्कराचे जवान आणि अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षणाच्या आठ तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आणि 70 जण जखमी झाले, असे लष्कर आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. मृताची ओळख अद्याप जाहीर झालेली नाही. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केला जात आहे.
तर जखमींमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत. काहींची प्रकृती गंभीर आहे. तर 30 हून अधिक जणांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी येथे दाखल करण्यात आले आहे, तर इतरांना ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि इतर जवळच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले.
दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांगलादेश हवाई दल आणि सरकारने या विमान दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.