शेड्यूल फिक्स, बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच भारत खेळणार टी-20 मालिका, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

शेड्यूल फिक्स, बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच भारत खेळणार टी-20 मालिका, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs BAN 2025: भारतीय संघ ऑगस्टमध्ये पहिल्यादांच बांगलादेशमध्ये टी-20 मालिका खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय संघ (Team India) बांगलादेशाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी आज बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केला आहे. बांगलादेश विरुध्द एकदिवसीय मालिका 17 ऑगस्टपासून सुरु होणार आहे तर टी-20 मालिका 26 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर या दौऱ्यासाठी भारतीय संघ 13 ऑगस्ट रोजी बांगलादेशात दाखल होणार आहे.

17 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिका

या दौऱ्यात भारतीय संघ पहिला एकदिवसीय सामना 17 ऑगस्ट रोजी तर दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट रोजी मीरपूर येथे खेळणार आहे. तर या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी भारतीय संघ चितगाव येथे खेळणार आहे.

26 ऑगस्टपासून टी-20 मालिका

तर भारतीय संघ या दौऱ्यात पहिला टी-20 सामना 26 ऑगस्ट रोजी चितगाव येथे आणि दुसरा टी-20 सामना 29 ऑगस्ट रोजी आणि तिसरा टी-20 सामना 31 ऑगस्ट रोजी मीरपूर येथे खेळणार आहे. बांगलादेश पहिल्यादा भारताविरुध्द टी-20 मालिकेत यजमानपद भूषवणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे सीईओ निजाम उद्दीन चौधरी यांनी या मालिकेबद्दल सांगितले की, “ही मालिका आमच्या देशांतर्गत क्रिकेट कॅलेंडरमधील सर्वात रोमांचक आणि सर्वात अपेक्षित स्पर्धांपैकी एक असल्याचे आश्वासन देते.

Indvsban

 

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना: 17 ऑगस्ट

दुसरा एकदिवसीय सामना: 20 ऑगस्ट

तिसरा एकदिवसीय सामना: 23 ऑगस्ट

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-20: 26 ऑगस्ट

दुसरा टी-20: 29 ऑगस्ट

नगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार; राज्य कॅबिनेट बैठकीत 7 महत्वाचे निर्णय

तिसरा टी-20: 31 ऑगस्ट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube