चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघात ‘राडा’, कोच गंभीर इंग्लंडला जाणार नाही, कारण काय?

Gautam Gambhir : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर आता भारतीय संघाने जून – जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध (ENGvsIND) होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरु केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मोठा निर्णय घेतला आहे. होय, या मालिकेपूर्वी गंभीरने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार गंभीर भारतीय संघासोबत इंग्लंडला जाणार नाही. याबाबत बीसीसीआयने देखील माहिती दिली आहे. मात्र यानंतर सोशल मीडियावर भारतीय संघात काही वाद निर्माण झालं आहे का? याबाबत चर्चा होत आहे. मात्र माहितीनुसार, इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी गौतम गंभीर भारतीय संघासोबत नाहीतर भारत अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची तयारी करत आहे. याबाबत त्याने बीसीसीआयशी देखील चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
गंभीर भारत अ संघासोबत इंग्लंडला जाणार ?
20 जूनपासून इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गंभीर भारत अ (India A) संघासह इंग्लंडला रवाना होणार असल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. जर असं झालं तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ही पहिली वेळ असेल जेव्हा वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक भारत अ संघासोबत दौऱ्यावर जाणार.
कारण काय?
माहितीनुसार, गौतम गंभीरने आतापासूनच इंग्लंड दौऱ्याची आणि 2027 च्या विश्वचषक तसेच टी-20 विश्वचषकासाठी तयारी केली आहे. भारत अ संघासोबत इंग्लंडला जाऊन गंभीर येणाऱ्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटसाठी कोण योग्य ठरु शकतो याचा शोध घेणार आहे. तसेच गंभीरला इंग्लंड दौऱ्यापूर्वी तिथली खेळपट्टी आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घ्यायची असल्याने त्याने भारतीय संघासोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत आतापर्यंत अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही.
टाईम्स ऑफ इंडियानुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतरच याबाबत बीसीसीआय आणि गंभीरची चर्चा झाली आहे. गंभीरने आता भारतासाठी राखीव खेळाडूंचा एक चांगला गट तयार करण्यावर लक्ष देत आहे. जे भविष्यात भारतीय संघाला सामने जिंकण्यास मदत करू शकतील.
भारताचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून
भारताचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरु होणार आहे. तर त्यापूर्वी भारतीय अ संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये सलग दोन मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. घराच्या मैदानावर न्यूझीलंडने भारतीय संघाचा 3-0 असा पराभव केला होता तर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यामुळे इंग्लंडदौऱ्यावर भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.