बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी कॅनडाचे नवे पंतप्रधान; जाणून घ्या कोण आहेत कार्नी?

Mark Carney is Canada New Prime Minister : कॅनडाच्या सत्ताधारी लिबरल पक्षाचे नवे नेते म्हणून बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी यांची निवड झाली आहे. ते देशाचे पुढील पंतप्रधान असणार आहेत. ( Prime Minister) कार्नी हे जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील, ज्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच पदाचा राजीनामा दिला होता.
अमेरिकेनंतर आता भारतीयांना कॅनडातूनही बाहेर पडावे लागणार; स्टडी व वर्क परमीटबाबत घेतला मोठा निर्णय
कार्नी हे 59 वर्षाचे आहेत. 86 टक्के मतं जिंकली आहेत. पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार चर्चेचे नेतृत्व करण्यासाठी आपण सर्वात योग्य आहेत असंही ते म्हणाले आहेत. कॅनडामध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेला बाहेरील व्यक्ती पंतप्रधान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्नी म्हणाले, ‘दोन G7 मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर म्हणून काम करणारा पहिला व्यक्ती म्हणून त्यांचा अनुभव ट्रम्प यांच्याशी व्यवहार करण्यासाठी त्यांना सर्वात योग्य बनवतो.’
मार्क कार्नी कोण आहेत?
मार्क कार्नी यांचा जन्म कॅनडातील वायव्य प्रदेशातील फोर्ट स्मिथ इथं झाला. त्यांचं बालपण एडमंटनमध्ये गेलं. त्यानंतर ते अमेरिकेला गेलं आणि हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. नंतर, कार्नी युनायटेड किंग्डमला गेले, जिथे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून 1995 मध्ये अर्थशास्त्रात प्रथम पदव्युत्तर पदवी आणि नंतर डॉक्टरेट मिळवली. 2008 मध्ये कार्नी यांची बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली.
कार्नी यांच्या नेतृत्वाची दखल लवकरच घेण्यात आली आणि 2010 मध्ये टाईम मासिकाने त्यांना जगातील २५ सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक म्हणून घोषित केले. २०११ मध्ये, रीडर्स डायजेस्ट कॅनडाने त्यांना मोस्ट ट्रस्टेड कॅनेडियन म्हणून घोषित केले आणि २०१२ मध्ये युरोमनी मासिकाने त्यांना “सेंट्रल बँक गव्हर्नर ऑफ द इयर” म्हणून घोषित केले. तसेच २०१३ मध्ये, कार्नी बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर बनले. संस्थेच्या ३०० वर्षांच्या इतिहासात ते पहिले बिगर-ब्रिटिश नागरिक बनले, ज्यांनी संघटनेचे नेतृत्व केले. त्यांनी २०२० पर्यंत या पदावर काम केले. अलिकडच्या वर्षांत, मार्क कार्नी यांनी अनेक प्रमुख महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
शेवटच्या भाषणात काय म्हणाले?
जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे शेवटचे भाषण दिले. आपल्या निरोपाच्या भाषणात ट्रुडो यांनी लोकांना देशाच्या भविष्याशी जोडून राहण्याचे आवाहन केले. मला चुकीचे समजू नका, गेल्या १० वर्षात आपण जे साध्य केले आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे; पण आजची रात्र एक पक्ष म्हणून, एक देश म्हणून आपल्या भविष्याबद्दल आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.