Champions Trophy 2025 मध्ये बुमराह खेळणार का? ‘या’ दिवशी बीसीसीआय घेणार अंतिम निर्णय
![Champions Trophy 2025 मध्ये बुमराह खेळणार का? ‘या’ दिवशी बीसीसीआय घेणार अंतिम निर्णय Champions Trophy 2025 मध्ये बुमराह खेळणार का? ‘या’ दिवशी बीसीसीआय घेणार अंतिम निर्णय](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Jasprit-Bumrah_V_jpg--1280x720-4g.webp)
Jasprit Bumrah : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनफिट भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) देखील समावेश करण्यात आला आहे. मात्र तो पूर्णपणे फिट नसल्याने त्याला सध्या इंग्लंडविरुद्ध (Ind Vs Eng) सुरू असणाऱ्या मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) खेळणार की नाही याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही याबाबात बीसीसीआय (BCCI) 11 फेब्रुवारी रोजी निर्णय घेणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने आयसीसीने सर्व संघाना काही बदल करण्यासाठी 12 फेब्रुवारीपर्यंत संधी दिली आहे. त्यामुळे बीसीसीआय बुमराहबद्दल 11 फेब्रुवारी रोजी निर्णय घेणार आहे.
India are set to take a final decision on Jasprit Bumrah’s Champions Trophy participation with the deadline for submission of the final squads approaching
Full story: https://t.co/22cEzur2s6 pic.twitter.com/DARDw5qTGL
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 10, 2025
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही यावर 11 फेब्रुवारी रोजी बीसीसीआय अंतिम निर्णय घेणार आहे. बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटच्या सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. बुमराहने अलिकडेच सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठीचे स्कॅन केले. बीसीसीआयची वैद्यकीय टीम आता निवडकर्त्यांशी आणि संघ व्यवस्थापनाशी बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल चर्चा करेल, त्यानंतर जस्सीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. तर दुसरीकडे बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसणार नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. तो आता थेट आयपीएल किंवा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतासाठी खेळताना दिसणार आहे असं देखील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.
बुमराहची जागा कोण घेणार?
जर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराह फिट नसेल तर त्याच्या जागी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) किंवा हर्षित राणाला (Harshit Rana) संघात समाविष्ट केले जाऊ शकते. हर्षितने नुकतेच इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आहे तर सिराजने भारतासाठी शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळला होता.