सतेज पाटलांचा प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार, त्यामुळेच सपकाळांना…; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली इनसाईड स्टोरी

  • Written By: Published:
सतेज पाटलांचा प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार, त्यामुळेच सपकाळांना…; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Prithviraj Chavan : काँग्रेसने (Congress) अखेर प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांना संधी दिली. प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), सतेज पाटील (Satej Patil), विजय वडेट्टीवार, अमित देशमुख या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाने बड्या चेहऱ्यांना डावलून सपकाळ यांना संधी दिला. दरम्यान, सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती कशी झाली याची इनसाईड स्टोरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितली.

एक वाक्य अन् अख्खं थिएटर हादरलं! ‘छावा’मधील ‘हा’ डायलॉग अंगावर शहारे आणतो… 

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसने पक्ष संघटनेते फेरबदल करण्याचा विचार केला आणि सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदासाठी नियुक्ती केली. याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, खरंतर, प्रदेशाध्यक्षपदासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव चर्चेत नव्हतेच. कारण ते महाराष्ट्रातील सीनियर नेते नाहीत. त्यांनी राहुल गांधींसोबत काम केलंय, कॉग्रेसशी ते निष्ठावान राहिले, हे सगळं खरंय. पण, त्याचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत नव्हतं.

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा साडीतील मोहक लूक, चाहते फिदा… 

पुढं ते म्हणाले, महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. परंतु, मी माझ्या ऐवजी कुठल्या तरुण नेत्याला संधी मिळाली, असं पक्ष नेतृत्वाला कळवले होतं. माझ्या अपेक्षेप्रमाणे सतेज पाटील यांचे नाव पुढे समोर यायला हवं होतं. कदाचित ते तसे आले देखील असेल. मात्र, सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद पद स्वीकारण्यास नकार दिला असेल. बहुतेक वरिष्ठ नेत्यांनी नकार दिल्यानंतर पक्षाला दुसरा विचार करावा लागला असेल, असं चव्हाण म्हणाले.

निःसंशयपणे, हर्षवर्धन सपकाळ चांगलं काम करतील. परंतु सपकाळ यांच्यासमोर महाविकास आघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत वाटावाटी करण्याचं आव्हान असेल, असंही चव्हाण म्हणाले.

आता आमच्यासाठी हा अध्याय संपला आहे. आता ते कसे काम करतात ते आपण पाहू, असे चव्हाण पुढे म्हणाले.

सतेज पाटील काय म्हणाले?
तर सतेज पाटलांनी देखील पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी मला अनेक फोन आले, पण पुढील चार वर्षे पक्षाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अवघड होते. दोन वर्षे नेतृत्व करणे ठीक आहे. परंतु, त्यापेक्षा जास्त काळ मला पद सांभाळणं शक्य नव्हतं. हर्षवर्धन सपकाळ चांगले काम करतील. ते पक्षाला वेळ देतील, कार्यकर्त्यांना भेटून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube