Rajasthan Election 2023 : काँग्रेसने खेळले महिला शक्ती कार्ड, 33 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 9 महिलांना तिकीट

  • Written By: Published:
Rajasthan Election 2023 : काँग्रेसने खेळले महिला शक्ती कार्ड, 33 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 9 महिलांना तिकीट

Rajasthan Election 2023 : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan assembly elections) काँग्रेसने (Congress) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 33 उमेदवारांची नावे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरदारपुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. टोंक विधानसभा मतदारसंघातून सचिन पायलट यांना पक्षाने तिकीट दिले आहे. सर्वांत महत्वाचं म्हणजे, काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 9 महिलांना तिकीट दिले.

नगरमध्ये मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी, मराठा समाजाची आक्रमक भूमिका 

प्रियंका गांधी यांच्या सभेनंतरच काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करेल, अशी चर्चा सुरू होती. आणि नेमके तेच झाले. शनिवारी दुपारी काँग्रेसने 33 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नवरात्री सुरू असतांना कॉंग्रेसने जाहीर केलेल्या 33 उमेदवारांच्या यादीत 9 महिलांचा समावेश करून महिला कार्ड खेळले आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सुमारे 100 विधानसभा जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर एकमत झाले होते. असे असतानाही काँग्रेसच्या पहिल्या यादीत केवळ 33 उमेदवारांची घोषणा केली. दुसरीकडे भाजपनेही आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये 83 नावांचा समावेश आहे.

या 9 महिला उमेदवारांचा यादीत समावेश
काँग्रेसने जाहीर केलेल्या 33 उमेदवारांच्या पहिल्या यादीत विविध विधानसभा जागांवर 9 महिला उमेदवार उतरवण्यात आल्या आहेत. यामध्ये सादुलपूर मतदार संघातून कृष्णा पुनिया, मंडवामधून रिता चौधरी, मालवीय नगरमधून अर्चना शर्मा, सिकराई मधून ममता भूपेश, जायलमधून मंजू देवी, तर ओसिया मतदार संघातून दिव्या मदेरणा, जोधपूरमधून मनीषा पनवार, वल्लभनगरमधून प्रीती गजेंद्र सिंग आणि कुशालगरमधून रमिला खाडिया यांच्या नावाचा समावेश आहे.

2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर रमिला खाडिया यांनी कुशलगढमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांचा विजय झाला होता. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कॉंग्रेसच्या संकटकाळात त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पाठिंबा दिला होता. अशोक गेहलोत यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. रमिला यांच्यासारख्या आमदारांमुळेच मी मुख्यमंत्री असल्याचे ते म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube