एक वाक्य अन् अख्खं थिएटर हादरलं! ‘छावा’मधील ‘हा’ डायलॉग अंगावर शहारे आणतो…

एक वाक्य अन् अख्खं थिएटर हादरलं! ‘छावा’मधील ‘हा’ डायलॉग अंगावर शहारे आणतो…

Chhaava Movie Released In Theatres : अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाला (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात (Bollywood) विकीने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘छावा’ 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याला पहिल्याच दिवसापासून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात (Bollywood News) विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय.

भाजप प्रदेशाध्यक्ष कोण होणार? मार्च महिन्यात शिक्कामोर्तब; बावनकुळेंनी काय सांगितलं?

‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतोय. तो पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रचंड गर्दी होत (Vicky Kaushal Film) आहे. या चित्रपटातील डायलॉग देखील खूप गाजत असल्याचं समोर आलंय. छत्रपती संभाजीराजे भोसलेंचा पराक्रम, अन् शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट अखेर प्रेक्षकांना भूरळ पाडतोय.

चित्रपट पाहताना सिनेमागृहं प्रेक्षकांच्या हर हर महादेव या घोषणांनी दणाणत आहेत. चित्रपटातील एक-एक शब्द आणि डायलॉग हा अंगावर काटा आणणारा आहे. चित्रपटामधील एका डायलॉगने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलंय. जेव्हा औरंगजेबाची मुलगी म्हणते ‘संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने’ तेव्हा सगळं सिनेमागृह स्तब्ध होताना दिसतंय.

फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच; बापू आंधळे प्रकरण पुन्हा समोर, पोलिसांकडून हालचालींना वेग

‘शेर नही रहा, लेकीन छावा अभी भी जंगल मै घुम रहा है’ हा डायलॉग सुद्धा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतोय. चित्रपटामध्ये विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत, अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत तर अभिनेता अक्षय खन्न या सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट इतर सर्व सिनेमांचे रेकॉर्ड तोडेल, असा अंदाज आहे.

‘स्वराज अभी खत्म नहीं हुआ है, स्वराज जिंदा है’ या डायलॉनचे तर सिनेमागृहच हादरल्याचं प्रेक्षक सांगत आहेत. ‘छावा’ची भव्यता आणि शक्तिशाली कहाणी पाहता, विश्लेषक त्याला 2025 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक मानत आहेत. पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये हाऊसफुल्ल शो आणि तिकिटांची मोठी मागणी दिसून येतेय. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केलंय. रॉनी स्क्रूवाला यांनी निर्मिती केली आहे. उत्कृष्ट पार्श्वसंगीत, भव्य सेट डिझाइन आणि व्हिज्युअल इफेक्ट्समुळे ऐतिहासिक चित्रपटांच्या श्रेणीत छावाल एक विशेष स्थान मिळालंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube