‘फक्त खुर्च्यांची अदलाबदल…’शिंदेंच्या डोक्यातून ‘ते’ जाईना, पवारांनी CM फडणवीसांना मारला डोळा अन् मंचावर हशा

‘फक्त खुर्च्यांची अदलाबदल…’शिंदेंच्या डोक्यातून ‘ते’ जाईना, पवारांनी CM फडणवीसांना मारला डोळा अन् मंचावर हशा

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde Press Conference : आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra budget 2025) सादर झाला. त्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपस्थित होते. महायुतीच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा खुर्चीकारण रंगल्याचं पाहायला मिळालंय.

राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेले महत्वाचे मुद्दे आणि विविध तरतुदी पुन्हा माध्यंमासमोर (Mahayuti Politics) मांडल्या. अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलण्यास सुरुवात केली होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील वेळी देखील आम्ही तिघे होतो. आता केवळ खुर्च्यांची थोडी अदलाबदल झालीय. यावर अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डोळा मारला अन् मंचावर एकच हशा पिकला.

पुनित बालन ग्रुप तर्फे ‘फ्रेंडशिप करंडक’ 2025 क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा आयोजित, रमणबाग फायटर्सला विजेतेपद

तेथे उपस्थित सर्वजण हसायला लागल्यानंतर पुन्हा अजित पवार यांनी सावरासावर केली. तुमच्या मनातून ते काही जात नाही, असं त्यांना एकनाथ शिंदे यांना म्हटलं. तर मग शिंदेंनी सुद्धा पुन्हा सावरासावर करत म्हटलं की, अदलाबदल झालीय मात्र टीम तीच आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अदलाबदली झालीय…बदलाबदली नाही. यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही सर्वांनी एकत्र टीम वर्क म्हणून काम केलंय. मागील अडीच वर्ष आम्ही करत आहोत. तेच पुढे देखील नेतोय. राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आजचा अर्थसंकल्प असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

‘गेल्या 10 हजार वर्षांतील सर्वात बोगस अर्थसंकल्प …’, उद्धव ठाकरेंचा CM फडणवीसांना खोचक टोला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगोदर देखील खुर्चांची केवळ अदलाबदल झालीय, असं वक्तव्य केलं होतं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं होतं. त्यावेळी देखील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे अडून दिसल्याचं समोर आलं होतं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रि‍पदासाठी आग्रही होते, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दोन ते तिन वेळेस खुर्च्यांची केवळ अदलाबदल झालीय, असं वक्तव्य केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात अजूनही खुर्चीचा विचार कायम असल्याचं पाहायला मिळतंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube