काॅंग्रेसला मोठा धक्का, कुणाल पाटील यांचा भाजपात प्रवेश

काॅंग्रेसला मोठा धक्का, कुणाल पाटील यांचा भाजपात प्रवेश

Kunal Patil Join BJP : राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज भाजपश्रेष्ठींच्या उपस्थितमध्ये भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.

माजी आमदार कुणाल पाटील लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Kunal Patil Join BJP)

काँग्रेसचा आता जनतेशी थेट संपर्क कमी झाल्याने भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे. राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटील पक्षावर नाराज असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

माध्यमांशी बोलताना कुणाल पाटील म्हणाले की, आपला जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातील विकासाचा बॅकलॉग भरुन काढायचा असल्याने आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा वर्षात भाजपने देशात ज्या पद्धतीने विकास केला आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाचे वातावरण निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी प्रलंबित प्रश्नांना सोडवण्याचे काम सुरु आहे. हे सर्व वातावरण पाहता कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक सर्वसामन्य जनतेत भावना निर्माण झाल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असं भाजप प्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना माजी आमदार कुणाल पाटील म्हणाले.

कुदरत के बवंडर का…इशारा अब समझ लो! गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube