भारताची टी 20i मालिकेत विजयी सलामी! नागपूरमध्ये न्यूझीलंडला 48 धावांनी चारली धूळ
भारतीय फलंदाजांनी मैदानात फटकेबाजी केली. निर्धारित 20 षटकांत भारताने 7 गडी गमावून 238 धावांचा डोंगर उभा केला.
भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20i मालिकेत (T20) विजयी सुरुवात केली आहे. भारताने नागपूरमध्ये न्यूझीलंडसमोर 239 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 190 धावांपर्यंत पोहचता आलं. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी मैदानात फटकेबाजी केली. निर्धारित 20 षटकांत भारताने 7 गडी गमावून 238 धावांचा डोंगर उभा केला. ही न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. भारतीय फलंदाजांच्या आक्रमक पवित्र्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लय सापडणे कठीण झाले होते.
न्यूझीलंडचा लढा अपयशी
239 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने जोरदार प्रयत्न केले. ग्लेन फिलिप्सने धमाकेदार खेळी केली, त्याने 40 चेंडूत 78 धावा केल्या. पण, तो 14 व्या षटकात बाद झाला. तो एकटा सोडला, तर बाकी कोणता खेळाडू फार काळ तग धरू शकला नाही. ज्यामुळे किवी फलंदाजांना निर्धारित षटकांत केवळ 200 धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडने शेवटपर्यंत संघर्ष केला, पण वाढत्या धावगतीच्या दबावामुळे त्यांना 38 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
संजू सॅमसन आणि ईशान किशन ठरले अपयशी
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. मात्र संजू सॅमसन केवळ 7 चेंडूमध्ये 10 धावा करून बाद झाला. काइल जैमीसनने त्याला माघारी धाडले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला ईशान किशनही फार काळ टिकू शकला नाही. त्याने 5 चेंडूमध्ये 8 धावा करून तोही बाद झाला.
चांगल्या फॉर्ममध्ये दिसला सूर्यकुमार यादव
यानंतर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी झाली. दोघांनीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मात्र त्यानंतर सूर्याकुमार यादव 32 चेंडूमध्ये 22 धावा करून बाद झाला. मिचेल सॅन्टनरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
