Rahul Gandhi यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर सरकारची परवानगी पण…

Rahul Gandhi यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर सरकारची परवानगी पण…

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आला होता. मणिपूर सरकारने (Manipur Govt) इम्फाळ पूर्वेतील हप्ता कांगजेबुंग येथून सुरू होणाऱ्या यात्रेची परवानगी नाकारली होती. मात्र आता ही परवानगी देण्यात आली आहे. पण यासाठी एक अट घालण्यात आली आहे.

Sunil Kedar यांना सुटकेचा जल्लोष भोवला; केदार यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल

मात्र मणिपूर सरकारने ही परवानगी देताना या यात्रेमध्ये मर्यादित लोकांचा सहभाग असावा. अशी अट देखील घातली आहे. परवानगी मागितल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी ही परवानगी अटीसह देण्यात आली आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये. तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी. यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडून ही अट घालण्यात आली असल्याचे सांगण्यात आलं आहे.

Horoscope Today : ‘वृषभ’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) च्या नेतृत्वाखाली काँग्रेस एका खाजगी ठिकाणाहून यात्रेला सुरुवात करणार आहे. 66 दिवसांच्या यात्रेसाठी पक्षाने अधिकृतपणे 2 जानेवारीला अर्ज सादर केला होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 14 जानेवारीला या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू होणार असून 15 राज्यांतून प्रवास करत 20 मार्च रोजी मुंबईत समारोप होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा यशस्वीपणे पार पडल्यानंतर दुसरी यात्रा सुरु होत आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले होते की, मणिपूर सरकारने इम्फाळमधील पॅलेस मैदानावरुन यात्रा आयोजित करण्याची आमची विनंती नाकारल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही पूर्वेकडून पश्चिमपर्यत यात्रा सुरू करत आहोत. तर आम्ही मणिपूरपासून कसे दूर राहू शकतो? मग आम्ही देशातील जनतेला काय संदेश देणार आहोत? प्रवासाची सुरुवात मणिपूरपासूनच करायची आहे. आता आपण मणिपूरमधील दुसऱ्या ठिकाणाहून यात्रा सुरू करणार आहोत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube