धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, पाहा संपूर्ण टीम

धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, पाहा संपूर्ण टीम

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालात खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. मार्क वुड (Mark Wood) संघात परत आला आहे.

टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. आता शेवटचा सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखालील इंग्लंडने या सामन्यापूर्वी मेहनत घेतली आहे.

अजितदादांवरील बायोपिकचा नायक कोण? उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं ‘या’ अभिनेत्याचं नाव

इंग्लंडने आज प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. इंग्लंडने ओली रॉबिन्सनला ब्रेक दिला आहे. त्याच्या जागी मार्क वुड प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. या मालिकेत वुडला आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळता आले आहेत. तो रांची कसोटीचा भाग नव्हता. वुडने भारताविरुद्ध हैदराबाद आणि राजकोटमध्ये सामने खेळले आहेत. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने 4 विकेट घेतले होते. मात्र, याशिवाय त्याला विकेट घेता आली नाही.

रॉबिन्सनला या मालिकेत आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. रॉबिन्सन रांची कसोटीत खेळला होता. या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते. पण एकही विकेट घेऊ शकला नाही. आता इंग्लंडची धर्मशालात या बदलांसह मैदानात उतरणार आहे.

प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
कॅटरीना- दीपिकानंतर Alia Bhatt दिसणार यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्समध्ये; सीईओंची माहिती

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज