अजितदादांवरील बायोपिकचा नायक कोण? उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं ‘या’ अभिनेत्याचं नाव

अजितदादांवरील बायोपिकचा नायक कोण? उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं ‘या’ अभिनेत्याचं नाव

Ajit Pawar :  महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव म्हणजे अजित पवार. अजितदादांच्या राजकीय चाली आणि वक्तव्यांची राजकारणात जोरदार चर्चा होत असते. हेच अजित पवार ज्यावेळी एखाद्या राजकारण विरहीत सोहळ्याला हजेरी लावतात त्यावेळीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. काल ‘झी चित्र गौरव पुरस्कार 2024’ सोहळा पार पडला. या सोहळ्याला अजित पवार उपस्थित होते. यावेळी अभिनेता अवधूत गुप्तेने अजितदादांची (Ajit Pawar) मुलाखत घेतली. अवधूत गुप्तेने त्यांना तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्याने भूमिका साकारावी असा प्रश्न विचारला. त्यावर अजितदादांनीही उत्तर देऊन टाकलं. त्यांच्या मुलाखतीचा हा प्रसंग चागंलाच चर्चेत आहे.

Ajit Pawar : दोघंही चांगलं बोलत अन् हसत होते, घडलेली घटना अतिशय.. अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

या मुलाखतीत अवधूत गुप्तेने अजित पवारांना विचारले की तुमच्यावर जर एखादा बायोपिक आला तर त्यात कोणत्या अभिनेत्याने भूमिका साकारावी असा प्रश्न केला. त्यावर अजित पवार यांनी निलेश साबळे यांचं नाव घेतलं. इतकच नाही तर याच कार्यक्रमात निलेश साबळे यांनी अजितदादांची मिमिक्रीही केली. या मिमिक्रीची दखल अजित पवार यांनी घेतली याचा खूप आनंद झाल्याचे निलेश साबळे यांनी सांगितले.

‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून निलेश साबळे घराघरात पोहोचले. साबळे हे चित्रपट अभिनेते आहेत. टेलिव्हिजन कार्यक्रम देखील ते प्रस्तुत करतात. महाराष्ट्र सुपरस्टार या रियालिटी शोचे विजेतेही आहेत. यानंतरच त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरने वेग घेतला. त्यानंतर एक मोहर अबोल, होम मिनिस्टर, फु बाई फु यांसारख्या कार्यक्रमांतून निलेश साबळे राज्यात ओळखले जाऊ लागले.

आता बायोपिकसाठी अजित पवार यांनी त्यांची निवड केली आहे. त्यामुळे जर भविष्यात अजित पवार यांच्या बायोपिकसाठी जर खरंच घोषणा झाली तर त्यात अजितदादांची भूमिका निलेश साबळे करताना दिसतील असे म्हणण्यास हरकत नाही.

राष्ट्रवादी अजित पवारांची अन् अजित पवार भाजपाचे;नार्वेकरांच्या निकालावर वडेट्टीवारांचा खोचक टोला

पार्थ पवारने डोक्यावर थंड बर्फ ठेवावा 

याच मुलाखतीत अवधूत गुप्तेने थंड बर्फाची वाटी हातात घेत विचारलं का हा बर्फ तुम्ही कुणाला पाठवायला सांगाल ज्याने तो डोक्यावर ठेऊन थंड व्हावं. यावर अजितदादांनी पार्थ पवार यांचं नाव घेतलं. यानंतर उपस्थितांत हशा पिकला. परंतु, अजित पवार यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, पार्थ पवार यांना निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज